वादळी पावसात वीज कडाडून दोन गायीचा दुर्दैवी मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 19:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गादा गावात काल मध्यरात्री 2 दरम्यान झालेल्या वादळी पावसात वीज कडाडून शेतात बांधलेल्या दोन गायीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार काल मध्यरात्री कामठी तालुक्यात सर्वत्र वादळी पावसासह विजेचा कडकडाट सुरू होता दरम्यान विद्दुत पुरवठा सुद्धा खंडित झाला होता.त्यातही वादळी पाऊस व विजेच्या गर्जनेने एक प्रकारचे भीतीमय वातावरण निर्माण झाले होते दरम्यान आजनी रहिवासी राजू चमेले यांच्या गादा गावात असलेल्या शेतात बांधून असलेल्या दोन गायिवर वीज पडल्याने दोन्ही गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.यासंदर्भात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

इंदर खुली कोळसा खदान येथुन दोन ट्रक मध्ये ५० टन कोळसा चोरी

Thu May 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस ६ कि मी अंतरावर इंदर काॅलरी खोल खुली खदान मधुन कोणी तरी चोराने दोन ट्रक मध्ये ५० टन कोळसा भरून चोरून नेल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला वेकोलि सुरक्षा अधिकारी यांचा तक्रारीने कन्हान पोलीसानी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.१७) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com