नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.11) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोन अंतर्गत हिल रोड, रामनगर चौक येथील स्नेहल कॅर्ट्रस यांच्याविरुध्द रस्त्यालगत कचरा पसरविल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शिवाजी नगर येथील रानडे बिल्डर्स यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
धंतोली झोन अंतर्गत गाडगे महाराज शाळेजवळ, रामबाग येथील श्री ड्राईव्हींन स्कुल यांच्याविरुध्द रस्त्यालगत मोठया प्रमाणात कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग न.25, अंबेनगर, पारडी येथील M/s Kamlai Clinic यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत जैव-वैद्यकीय कचरा आढळल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत प्लॉट न.37, दयाल सोसायटी, जरिपटका येथील दिपक नागवाणी यांच्याविरुध्द जवळपासच्या मोकळया जागेवर कचरा जाळला जात असल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.