नागपुर :- २२ मे रोजी शिवसेना, भारतीय कामगार संघटना, माथाडी व जनरल कामगार युनियन नागपूर च्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेश रंगारी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवा नेते आदित्य ठाकरे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यांचे नागपूर शहरात आगमन झाले. यावेळी सर्वश्री विशाल बरबटे, माजी खासदार प्रकाश जाधव, सतीश हरडे, देवेंद्र गोडबोले, हर्षल काकडे, सिद्धू कोमजवार, गजानन चकोले, सुशीला नायक, बोडखे, आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.