स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाव्दारे कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.8) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 21 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रामदासपेठ येथील M/s Shreeniwas Recon Pvt Ltd यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील विदर्भ फेड्रेशन एकॅडमी यांच्याविरुध्द अनधिकृत ठिकाणी कचरा आणि कचरा पेटवतांना आढळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत सुर्या नगर येथील M/s Litil Milanium यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर बॅनर / होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 6 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान वाहतूक मार्गात बदल

Thu Feb 9 , 2023
नागपूर : जिल्हयातील जामठा क्रिकेट स्टेडियमवर 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. उभय संघादरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने जामठाकडे येतात. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन अपघातप्रवण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जड वाहतूक करणारी वाहने या गर्दीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com