– पिडीत स्वस्त धान्य दुकानदार यांना न्याय देण्याची मागणी
– विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद
भंडारा :- भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडारा यांनी स्वस्त धान्य दुकानदार पिडीता यांचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सहाय्यक पुरवठा निरीक्षक यांना निलंबित करण्याबात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
प्रकरण असे की, पिडीत स्वस्त धान्य दुकानदार ही २१ जानेवारी २०२४ रोजी दुकानावर असतांना भाऊराव देवानंद भैसारे सहाय्यक पुरवठा निरीक्षक यांनी सकाळी १०.४५ वाजता रोज रविवार सुट्टीच्या दिवसी सदर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या दुकानात जावून तिला धमकावले तसेच तु मला सायंकाळी भेट जर तु मला भेटली नाही तर तुझा दुकानाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करीन असे धमकी देत तिला बाजुला बोलावून तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी पिडितेने २१ जानेवारी २०२४ ला पोलिस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद केला. प्रकरणाची चौकशी सुरु असून भाऊराव दिवान भैसारे यांच्या विरोधात भारतीय दंड सहिता १८६० च/३५४, भारतीय दंड सहिता १८६०/३५४ अ, भारतीय दंड सहिता १८६०/५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. प्रकरणी भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेकडून सबंधित भाऊराव दिवान भैसारे सहाय्यक पुरवठा (तात्पुरता) निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे अश्या आशयाचे निवदेन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडाराचे अरविंद कारेमोरे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.