भाऊराव दिवान भैसारे सहाय्यक पुरवठा निरीक्षक यांना निलंबित करा, भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडारा यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

– पिडीत स्वस्त धान्य दुकानदार यांना न्याय देण्याची मागणी

– विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंद

भंडारा :- भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडारा यांनी स्वस्त धान्य दुकानदार पिडीता यांचा विनयभंग केल्याप्रकरणी तसेच सहाय्यक पुरवठा निरीक्षक यांना निलंबित करण्याबात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्रकरण असे की, पिडीत स्वस्त धान्य दुकानदार ही २१ जानेवारी २०२४ रोजी दुकानावर असतांना भाऊराव देवानंद भैसारे सहाय्यक पुरवठा निरीक्षक यांनी सकाळी १०.४५ वाजता रोज रविवार सुट्टीच्या दिवसी सदर स्वस्त धान्य दुकानदार यांच्या दुकानात जावून तिला धमकावले तसेच तु मला सायंकाळी भेट जर तु मला भेटली नाही तर तुझा दुकानाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करीन असे धमकी देत तिला बाजुला बोलावून तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी पिडितेने २१ जानेवारी २०२४ ला पोलिस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद केला. प्रकरणाची चौकशी सुरु असून भाऊराव दिवान भैसारे यांच्या विरोधात भारतीय दंड सहिता १८६० च/३५४, भारतीय दंड सहिता १८६०/३५४ अ, भारतीय दंड सहिता १८६०/५०६ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. प्रकरणी भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकान संघटनेकडून सबंधित भाऊराव दिवान भैसारे सहाय्यक पुरवठा (तात्पुरता) निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे अश्या आशयाचे निवदेन जिल्हाधिकारी भंडारा यांना देण्यात आले.

निवेदन देतेवेळी भंडारा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडाराचे अरविंद कारेमोरे अध्यक्ष तसेच पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

NewsToday24x7

Next Post

नागपुर जिल्हा शिवसेने तर्फे संपूर्ण जिल्यात संक्रातीनिमित्य हळदी कुंकु चा कार्यक्रम

Wed Jan 31 , 2024
नागपुर :- जिल्हा शिवसेने तर्फे संपूर्ण जिल्यात संक्रातीनिमित्य हळदी कुंकु चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातुन जिल्यातील महिलांच्या सोबत संवाद साधुन त्यांचेशी चर्चा व प्रश्न समजवून घेण्याचे कार्य सातत्याने रेवती कृपाल तुमाने करत आहेत. नुकताच, शिवसेना महिला जिल्हा संघटिका अनिता जाधव यांनी अक्षय भवन नंदनवन येथे भव्य हळदी कुंकचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन सहाजिकच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com