संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राज्य शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या अनुषंगाने शासकीय आदेशानुसार कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात शुक्रवार 2 फेब्रुवारी पर्यंत सर्वेक्षण करण्यात आले ज्यामध्ये कामठी तालुक्यातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण करीत नागरिकांचे जातिनिहाय सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कामठी तालुक्यातील एकूण 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.
कामठी तालुक्यात एकूण 78 गावे येत असून तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात 2 फेब्रुवारी पर्यंत करण्यात आलेल्या मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणासाठी राबविलेल्या शासकीय यंत्रणेत एकूण 664 प्रगणक व 58 पर्यवेक्षकांनी सहभाग घेतला होता.या सर्वेक्षणात मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची संख्या ही 4 हजार 818 असून इतर प्रवर्गातील कुटुंब संख्या ही 53 हजार 766 आहे यानुसार एकुण 58 हजार 584 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.