ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी साखर कारखाना ठरणार वरदान – प्रफुल पटेल  

– नॅचरल ग्रोवर्स साखर कारखाना गाळप हंगामाचे खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते शुभारंभ

गोंदिया:- शुभारंभ प्रसंगी खा. प्रफुल पटेल म्हणाले की, परिस्थितीनुरूप हा कारखाना बंद पडला होता पण या वैनगंगा व चुलबंद नदीच्या खोऱ्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी व लोकोपयोगी कामांसाठी पुन्हा साखर कारखाना सुरु करण्यात आला आहे. निश्चितच लाखांदूर, पवनी, अर्जुनी मोर, साकोली, लाखनी, सडक अर्जुनी, देसाईगंज व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी वरदान ठरणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना अन्य पिकांच्या उत्पादनाचा पर्याय मिळावा व शेतीवर आधारित अन्य उदयोग यावेत याच उद्देशाने कारखाना सुरु करण्यास प्रयत्न असे प्रतिपादन पटेल यांनी केले.

आज लाखांदूर जि. भंडारा येथील नॅचरल ग्रोवर्स साखर कारखान्याच्या पहिले गाळप हंगामाचे शुभारंभ, गव्हाण व मोळी पूजन कार्यक्रम खासदार प्रफुल पटेल यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

खा. पटेल पुढे म्हणाले की, कामांसाठी कोणतीही बोंबाबोंब न करता विकास कार्य करण्यावर विश्वास ठेवतो. शेतकरी व शेतमजुर व बेरोजगारांचे हितासाठी नेहमी प्रयत्न केले आहेत. सध्या साखर कारखान्याची क्षमता ८०० मेट्रिक टन असून पुढे कारखान्याची क्षमता वाढविण्यात येणार आहे. या कारखान्यामुळे परिसरातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असून प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पणे शेतमजूर व बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार आहे. 

या शुभारंभ प्रसंगी खा. प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, नाना पंचबुद्धे, गंगाधर परशुरामकर, बाबा गुजर, सुनील फुंडे, धनंजय दलाल,  यशवंत गणवीर, विनोद ठाकरे, अविनाश ब्राह्मणकर, संजय गुजर, सत्यजित गुजर, विजय सावरबांधे, बालूभाऊ चुन्ने, लोकपाल गहाने, संजना वरखडे, निमा ठाकरे, कल्पना जाधव, डॉ अविनाश काशीवार, लोमेश वैद्य, हरीश तलमले, अड मोहन राऊत, धनु व्यास, नागेश पाटील, देविदास राऊत, दानेश साखरे, नरेंद्र चौधरी,  बबन पिलारे, राकेश राऊत, उमेश राऊत, सचिन बरंय सहित मोठ्या संख्येने शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

NewsToday24x7

Next Post

नागपुर में कौन होगा कांग्रेस का लोकसभा प्रत्याशी, संभ्रम में सभी 

Wed Nov 29 , 2023
– प्रदेश कांग्रेस ने मांगी रिपोर्ट, बूथ से ब्लॉक तक होगी चर्चा Your browser does not support HTML5 video. नागपुर :- लोकसभा चुनाव में भाजपा के सामने तगडी चुनौती खडी करने हेतु प्रदेश कांग्रेस के निर्देशानुसार शहर कांग्रेस ने पार्टी प्रत्याशी का नाम तय करने से पहले पार्टी कार्यकर्ताओं के मन की बात को जानने का प्रयास शुरु किया है. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com