संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
पारशिवनी :- बारावीच्या परीक्षेत हरिहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली असून विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेत अहिल्या थोटे हिने ७८.८३ टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. कामिनी खंडारे हिने ७६.६७ टक्के गुण घेऊन द्वितीय तट वैष्णवी बडवाईक हिने ७२.८३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला. कला शाखेत आस्था शांग्रपवार (७५.३३) प्रथम, पायल भैरव (७१.६७) द्वितीय तर पायल ठाकरे (६९.५०) हिने तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत निशांत बोपचे (८४.८३) प्रथम, नीलाक्षी चिमोटे (८३.५०) द्वितीय तर अविनाश सोनटक्के (७७) तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्यकांत वानखेडे यांनी अभिनंदन केले आहे.