नागरिकांचे गहाळ झालेले 10 मोबाईल जरीपटका पोलिसांकडून परत

संदीप कांबळे, कामठी

नागपुर  20 :-  नागरिकांचे गहाळ झालेले 10 महागडे मोबाईल जरीपटका नागपूर पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांकडून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल पैकी 10 मोबाईल परिमंडळ क्र 5 चे पोलिस उपायुक्त मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांच्या हस्ते नागरिकांना परत करण्यात आले.
नागपूर परिमंडळ क्र 5 अंतर्गत महागडे मोबाईल हरवणे व गहाळ होण्याच्या घटना वाढत असल्याने त्याच्या नोंदी संबंधित पोलीस ठाण्यात होत असत. त्यामुळे हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी परिमंडळ क्र 5 चे पोलीस उप आयुक्त मनीष कलवानिया यांनी एक विशेष पथक कार्यरत केले आणि शोध सुरू केला.
या पथकात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार उपेंद्र आकोटकर व सुनील यादव यांनी मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेत 10 मोबाईलचा शोध लावून संबंधित व्यक्तींना परत देण्यात आले आहेत. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Next Post

आरोग्य शिबीर हा अतिशय चांगला उपक्रम-आमदार सावरकर

Wed Apr 20 , 2022
संदीप कांबळे, कामठी -आयुष्यमान कार्ड हे आरोग्यदायी एटीएम कामठी ता प्र 20:- गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली.ही योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी लाभदायक ठरत असून आयुष्यमान कार्ड म्हणजे आरोग्यदायी एटीएम होय तसेच आयुष्यमान भारत योजने अंतर्गत रुग्णांना पाच लाख रुपया पर्यंत साहाय्य केले जाते त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे मौलिक प्रतिपादन आमंदार टेकचंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com