संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जे पी नगर रहिवासी इसमाची काल रात्री अचानक प्रकृती बिघडून तोंडातुन पांढऱ्या रंगाचा फेस फेकत तडकाफडकी अकस्मात मृत्यु झाल्याची घटना गतरात्री घडली असून मृतक इसमाचे नाव अमरदीप डोंगरे वय 50 वर्षे असे आहे.मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नसले तरी मृतकाच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.
पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतकाच्या पाठिंमागे पत्नी व दोन मुली असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.