बेला :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार नागपूर ग्रामीणचे नवनियुक्त कार्याध्यक्ष किशोर बेलसरे यांनी उमरेड शहर व तालुका ग्रामीणच्या संघटनात्मक बांधणीसाठी सोमवारला दौरा केला. त्यासाठी उमरेड येथील भिशी नाका चौकातील संत जगनाडे कॉम्प्लेक्स मध्ये कार्यकर्त्यांची छोटेखानी सभा उत्साहात पार पडली. यावेळी तालुकाध्यक्ष उत्तम पराते यांनी त्यांचे स्वागत करून पक्षाची सद्यस्थिती मांडली. तालुक्यातील चारही जिल्हा परिषद सर्कल मध्ये 11 पदाधिकारी यांची कार्यकारिणी व तालुक्याची कार्यकारणी गठित करण्यात यावी. व त्यानुसार पक्षाचे संघटन वाढविण्यात यावे. अशा प्रकारच्या सूचना बेलसरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
सभेला कुहीचे दिनेश साळवे, पारशिवनीचे शामराव मेश्राम, जिल्हा कमिटीचे सदस्य तुकाराम फलके, माजी सरपंच अशोक मून, माजी ग्रा.पं. सदस्य रामदास क्षीरसागर, विष्णू कोल्हे, अनिल भोयर,प्रफुल निंबाळकर, विनोद लडी व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.