– नेर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
नेर :- अथक परिश्रमातून मिळवलेले यश आयुष्यात नेहमीच उचित सन्मान देते. अधिक जोमाने काम करण्याचे पाठबळ देतो. भविष्यात अधिकाधिक संधी हेरण्यासाठी ताकद आणि ऊर्जा देतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. नेरे येथे आयोजित दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार शिवाजी मगर, ज्येष्ठ नेते परमानंद अग्रवाल, नामदेवराव खोब्रागडे, मनोज नाल्हे, वैशाली मासाळ, आमीन चौहान आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून आपण सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहो. विद्यार्थ्यांच्या या यशाचे पालकांसाठी जितके अप्रूप आहे, तितकेच आपल्यासाठी देखील आहे. केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर कुटुंबातील सदस्य म्हणून मी नेहमीच आपल्या आनंदात सहभागी होत असतो, असे ते म्हणाले. काही विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले असतील, पण ती त्यांची अंतिम कामगिरी नाही. येणाऱ्या काळात प्रयत्नांची पराकाष्ठा करा, अभ्यासात सातत्य ठेवा, यश तुमचेच आहे. पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून माझाही उर अभिमानाने भरून आला, असे पालकमंत्री संजय राठोड यावेळी म्हणाले.
यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी श्रद्धा आगासे (प्रथम), समीक्षा गोदे (द्वितीय) आणि नेतल नहार (तृतीय) यांचा, बारावी विज्ञान शाखेतील निशांत जाधव (प्रथम), आदित्य खोडे (द्वितीय), चैतन्य देशमुख (तृतीय), कला शाखेतील गौरी तिवसकर (प्रथम), अनिकेत पवार (द्वितीय), सुप्रिया नगराळे आणि अशमीरा फीरदोस मो. हाफीज (तृतीय) तर वाणिज्य शाखेतन प्रथम आलेल्या गौरी राठोड, प्रतीक्षा सहारे (द्वितीय) आणि भाग्यश्री क्षीरसागर (तृतीय) यांचा पालकमंत्री संजय राठोड व पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र, भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. २०२३ -२४ या शैक्षणिक सत्रात दारव्हा, दिग्रस आणि नेर तालुक्यात जवळपास तीन हजार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास दिपक आडे, इंद्रजित चव्हाण, सूमीत खांदवे, सुजित कुंभारे, निलेश शेळके, रूपेश गुल्हाने, कुणाल भोयर, मयुर काळे, विवेक राऊत, नागसेन डोंगरे, निलेश नाल्हे, आनंद मेहत्रे, मयुर गावंडे, मुकेश मेश्राम, सुभाष भोयर, रितेश चिरडे, वैशली मासाळ, अर्चना इसाळकर, सारिका महल्ले, भरत मसराम, पिंटू पाटील खोडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन नेर तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना यांनी संयक्तपणे केले. कार्यक्रमास पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.