संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मासोळ्या पकडण्याच्या नादात व्यस्त असलेले कामठी तालुक्यातील भुगाव रहिवासी पाच तरुण वरंभा च्या पुरसदृश्य नाल्यात अडकून झाडावर बसून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पाचही तरुणांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यशप्राप्त झाल्याची घटना आज घडली .
प्राप्त माहिती नुसार काल रात्री साडे नऊ वाजेपासून कामठी तालुक्यात सुरू झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने पावसाचा चांगलाच फटका बसला.पाऊस कसाबसा सकाळी 6 वाजता कमी झाल्याने मासोळ्या पकडण्याच्या नादात कामठी तालुक्यातील पाच तरुण संगणमताने गावाजवळील वरंभा गावाच्या पाणीसंचय तलावसदृश्य नाल्यातील मासोळ्या पकडायला दुपारी बारा वाजता गेले असता अचानक नाग नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा स्रोत जोमाने वाहत येऊन या तलावसदृश्य पाण्यात मिसळल्याने या पाच तरुणांची चांगलीच तारांबळ उडाली याप्रसंगी या तरुणांना पोहताही येईना तर बाहेर निघताही येईना अशा प्रसंगी जीव वाचवण्याच्या बेतात नजीकच्या झाडावर चढून मदतीच्या प्रतीक्षेत होते.
या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, जी प च्या महिला व बाल कल्याण सभापती प्रा अवंतिका लेकुरवाडे,जी प सदस्य दिनेश ढोले यांना कळताच या तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्वरित सदर घटनेसंदर्भात एसडीओ संजय पवार, तहसिलदार अक्षय पोयाम यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशातून खुद्द घटनास्थळ गाठले याप्रसंगी एसडीओ संजय पवार,तहसीलदार अक्षय पोयाम, नायब तहसिलदार राजीव बमनोटे,मंडळ अधिकारी संजय कांबळे यांनी एसडीआरएफ मार्फत बोटीच्या साहाय्याने पुरात अडकलेल्या या पाचही तरुणाना बाहेर काढण्यात यश गाठले. याप्रसंगी या पाचही तरुणांना नवसंजीवणी मिळाल्याचे विचार व्यक्त करीत माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर, प्रा अवंतिका लेकुरवाडे, जी प सदस्य दिनेश ढोले, स्थानिक प्रशासनिक अधिकारी चे आभार मानले.