मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाईन तत्काळ सादर करा.

नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून 2022-23 या शैक्षणिक सत्रासाठी महाडीबीटी या प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी अर्ज भरण्याकरीता 21 सप्टेंबर 2022 पासून महाडीबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी केलेली नाही. 2022-23 या शैक्षणिक सत्राकरीता विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती अर्जाची नोंदणी तात्काळ शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन् करावी.

संबंधित महाविद्यालयांनी नोंदणीकृत झालेले अनुसूचित जाती, विमाप्र, विजाभज व इमाव प्रवार्गाचे अर्ज तपासणी करून अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर करावे. सदर प्रवर्गाचा एकही पात्र लाभार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहणार नाही याची महाविद्यालयाने खबरदारी घ्यावी. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

NewsToday24x7

Next Post

जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित 

Fri Feb 17 , 2023
जिल्हा युवा पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित  नागपूर दि. 16: क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत जिल्हा युवा पुरस्कारांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील युवकांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्यासाठी युवकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रतिवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी शासनामार्फत देण्यात येतो. नागपूर जिल्ह्यातील युवक युवती व संस्थांनी सन 2022-23 या वर्षासाठी अर्ज […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com