विध्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा – बबलू गौतम

संदीप बलविर, प्रतिनिधी

बालाजी कॉन्व्हेंट येथे विज्ञान प्रदर्शनी

नागपूर :-विज्ञान व विज्ञानाचे चमत्कार खरच अतुलनीय तसेच नेत्रदीपक असतात मनाला वेड लावणारे असे विज्ञानाचे चमत्कार आपल्या अवतीभवती व संपूर्ण जगात बघायला मिळत आहे.देशाचे भविष्य समजल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञानाची ओढ लावण्यासाठी मंगळवार दिनांक २४ जानेवारीला बुटीबोरी स्थित बालाजी कॉन्व्हेंट माध्यमिक,कनिष्ठ महविद्यालय व मराठी माध्यम मधील विद्यार्थ्यानं करीता शाळेत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम,तर प्रमुख अतिथी म्हणून आरोग्य सभापती अरविंद (मुन्ना )जयस्वाल,वसंतराव जेऊरकर गुरुजी मुख्याध्यापक जिजामाता शाळा,सुभाष श्रीपादवार व श्रद्धा , बालाजी ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रविण भोयर,गणेश बुटके व निखिल साबळे सर उपस्थित होते.

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विज्ञान मार्गावर चालून कलाम यांचे स्वप्न साकार करण्याचा एक प्रयत्न बालाजी कॉन्व्हेंट मधील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी डोळ्याचे पारणे फेडणारे वैज्ञानिक प्रयोग तयार करून विज्ञान प्रदर्शनीला हजेरी लावली.

अनेक विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनी आपला सहभाग नोंदवला.कागद,खर्डा,बांबू,निरुपयोगी प्लास्टिक वस्तू पासून अनेक प्रयोग तयार करून या विज्ञान प्रदर्शनीत ठेवण्यात आले.जवळपास १२० मॉडेल्स या ठिकाणी ठेवण्यात आले व ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा अनुभव घेतला. अरविंद जैस्वाल व,पाहुण्यांनी संपूर्ण प्रदर्शनीची पाहणी करून विद्यार्थ्यास क्रमांक दिला. तर नगराध्यक्षानी या प्रदर्शनीला हजेरी लावलेल्या संपूर्ण विद्यार्थ्यास बक्षीस देऊन प्रोत्साहित केले.

याकरिता कनिष्ठ महाविद्यालयचे प्राचार्य प्रवीण भोयर उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक गणेश बुटके व मराठी माध्यमचे मुख्याध्यापक निखिल साबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून या विज्ञान प्रदर्शनीचे सफल व उत्कृष्ट आयोजन केले.त्याबद्दल शाळेचे संचालक डॉ.प्रकाश नेऊलकर यांनी विद्यार्थ्यासह संपूर्ण शिक्षकांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी खरोखरच विज्ञानाच्या उत्कृष्ट प्रयोगांचे नमुने सादर केले अशा या प्रयोगातूनच भारताला महासत्ता बनवणारे वैज्ञानिक नक्कीच तयार होतील अशी आशा बाळगतो व या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

बबलू गौतम,नगराध्यक्ष,नगरपरिषद,बुटीबोरी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागरी सेवा परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

Fri Jan 27 , 2023
नागपूर : ‘संघ लोकसेवा आयोग’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२२-२३ च्या परीक्षेचा निकाल 6 डिसेंबरला घोषित झालेला असून मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने अभिरूप मुलाखत प्रशिक्षण- 2023 कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागातर्फे करण्यात झालेले आहे. या कार्यक्रमातंर्गत उमेदवारांसाठी दिल्ली येथील जूने महाराष्ट्र सदन, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com