बेलडोंगरी माईन ला प्रकाश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– आगामी काळात राजधानी दिल्ली येथे सादरीकरणाची संधी. 

कन्हान :- माॅयल लिमिटेड बेलडोंगरी माईन (साटक) येथे ” व्यसनमुक्ती व हिन्दी भाषा बढावा” याविषयावर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. यावेळी खान प्रबंधक सी आर एम रेड्डी ,कर्मिक अधिकारी ललीत अरसडे, प्रबंधक रियाज कुरेशी, मनोहर गजभिये , पियुष बागडे यांच्यासह माॅयल कर्मचारी उपस्थित होते. या सादरीकरणात प्रकाश हायस्कूल अँड ज्युनि अर कॉलेज कान्द्री माईन च्या विद्यार्थ्यांनी व्यसनामुळे शरिराची होणारी हानी, सामाजिक ऐक्याला धक्का, कौटुंबिक हिंसाचार, कामाची अनियमितता, राष्ट्रीय एकात्मता, हिन्दी भाषा महत्त्व, विविध भाषांचे प्रत्यक्षात सादरीकरण केले. अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आल्यामुळे खान प्रबंधकांकडुन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करुन सत्कार करण्यात आला. या प्रभावी सादरीकरणामुळे प्रकाश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कान्द्री माईन शाळेचे पथनाट्य राजधानी दिल्लीत लवकरच डेरेदाखल होऊन आपल्या कलेची चुणुक दाखवणार आहे. पथनाट्य सादरीकरणात हर्षीता कठौते, साक्षी खोब्रागडे, साक्षी कठौते, तानिया रौतेल, स्नेहा रौतेल, दिपक ठाकरे, रोशन कुभरे, हर्ष कठौते, सोमकुमार कठौते, अंचित उईके, मयंक कठौते या विद्यार्थ्यांचा समावेश होता. मार्गदर्शन प्रा.ज्योत्सना मेश्राम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य मिलिंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेल्वे अपघातात भूषण सोनटक्के या युवकाचा मृत्यु

Mon May 6 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – नागपुर बॉयपास टेकाडी पुला खालील रेल्वे लाईनवर घटना, पोस्टे ला गुन्हा दाखल.   कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी बॉयपास पुला खालील रामटेक इतवारी रेल्वे लाईनवर अपघाता त भूषण सेनटक्के या युवकाचा मृत्यु झाल्याची धक्का दायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस सुत्राकडुन प्राप्त माहिती नुसार अमोल केशवराव सोनटक्के वय ३० वर्ष रा. नागपुर यांचे रामटेक ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com