नरखेड :- श्री पंढरीनाथ कला – वाणिज्य महाविद्यालय नरखेड येथील मराठी विभागाद्वारे मराठी वाड:मय मंडळाचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला .यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे हे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उपस्थित होते. ते श्री पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. यावेळी महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी ते ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष असा दुग्ध शर्करा योग यावेळी साधला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत जवंजाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रेरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजीत गुप्ता उपस्थित होते. तसेच डॉ. रवींद्र शोभणे यांच्या सहचरणी शरयू शोभणे या प्रामुख्याने या कार्यक्रमात उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरपरिषद शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अशोक भक्त यांनी डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या साहित्याचा समग्र आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्याची माहिती करून दिली. तर प्रा. दिलीप दातीर यांनी डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा परिचय मान्यवरांना करून दिला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी मराठी भाषा व्यावसायिक दृष्टीने अभ्यासने किती आवश्यक आहे आणि त्यासाठी मराठी भाषेचे अवलोकन आणि अध्ययन कशा प्रकारे करायला हवे याविषयी डॉ.रवींद्र शोभणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील रंजक गोष्टी आणि जिद्दीचा प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिस्तीने अभ्यास करून व महाविद्यालयात चांगली वर्तणूक करून जीवनात कसे यश संपादन करावे याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अभिजीत गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्यांनी मराठी वाड:मय मंडळाद्वारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना कसा वाव मिळेल ती संधी उपलब्ध करून देण्यास महाविद्यालय कसे कटिबद्ध आहे याविषयी विद्यार्थ्यांना आश्वासित केले. याप्रसंगी ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल आणि पंढरीनाथ कला वाणिज्य महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी म्हणून महाविद्यालयातर्फे डॉ. रवींद्र शोभणे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. विजय राऊत यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद बालगोटे यांनी केले तर आभार प्राध्यापक राम फुले यांनी मानले.
एनसीसी महाराष्ट्र बटालियन २० च्या कॅडेट्सनी डॉक्टर रवींद्र शोभणे यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाला पारशिवनी येथील प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर खडसे, प्रा. प्रमोद टोणपे एनसीसी प्रमुख प्रा. हरीश घरत,डॉ सुधीर नारनवरे, प्रा.पवन महंत, प्रा सतीश चंदेल, डॉ. रवी सोरते, डॉ. सुधाकर पवार, डॉ. अनिल गणवीर, डॉ.श्वेता वाजपेयी प्रा.शिरीष खोबे,यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रा. अशोक मदनकर,प्रा. नेहा धर्मे,प्रा. अक्षय पुनवटकर,प्रा. देवेंद्र उईके, प्रा. हिरामण ढोके, प्रा.मीना खडसे, गणेश उईके, आशा खडसे विध्यार्थीनी गीता रेवतकर, आचल ढबाले, मृणाली ढबाले, चंचल बनसोड, वैष्णवी बनाईत मयुरी पखाले, यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी मराठी विभागातील विद्यार्थी व एनसीसी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.