नागपूर :- दीक्षाभूमी स्मारक समितीकडे असलेल्या जागेच्या कमतरतेमुळे स्मारकाच्या सौंदर्यकरण व विकास कामात अडथळे येत आहेत. त्यामुळे स्मारकाच्या उत्तरेकडील कॉटन रिसर्च सेंटर (पंजाबराव कृषी विद्यापीठ) ची 5 एकर जागा व पूर्वेकडील आरोग्य विभाग (व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट) ची 16 एकर जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला धम्मकार्य व शैक्षणिक कार्याकरिता देण्यात यावी अशा प्रकारची मागणी बुद्धिस्टंट स्टुडंट असोसिएशन ने नागपूर जिल्हा धिकाऱ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे एका शिष्टमंडळाद्वारे केली आहे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोंबर 1956 रोजी ज्या जागेवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली त्या जागेला दीक्षाभूमी म्हणून जगभर मान्यता मिळाली. येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, संविधान दिन, महापरिनिर्वाण दिन, शौर्य दिन, गणराज्य दिन, धम्म संमेलन आदि कार्यक्रम वर्षभर होत असतात.
दीक्षाभूमी ही प्रेरणाभूमी असल्याने येथे वर्षभर लाखो अनुयायांची येजा सुरू असते. येथे धम्मकार्य, प्रबोधनात्मक व शैक्षणिक कार्य नियमित सुरू असते. दीक्षाभूमी ला पर्यटनाचा अ दर्जा मिळाला असल्याने स्मारकाच्या विकासा करिता व अनुयाया करिता दिवसेंदिवस जागा अपुरी पडत आहे. स्मारका शेजारची जागा महाराष्ट्र शासना साठी निरुपयोगी असल्याने शासनाने ती विनाविलंब डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर च्या स्वाधीन करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
बुद्धिस्टंट स्टुडन्ट असोसिएशन चे अध्यक्ष भिक्खू महेंद्र कौसल, सचीव उत्तम शेवडे, कोषाध्यक्ष सुनील लांडे, उपाध्यक्ष नरेश मेश्राम, सिद्धार्थ फोपरे, परशराम पाटील, दिलीप गायकवाड, शामराव हाडके, मोरेश्वर मंडपे, विजय जांगळेकर, हिरालाल मेश्राम, किशोर भैसारे, विजय वासनिक आदींनी दिलेले निवेदन जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत उपजिल्हाधिकारी महाजन ह्यांनी स्वीकारले.
बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन ही नागपूर विद्यापीठातील डॉ आंबेडकर विचारधारा, बौद्ध अध्ययन, पाली पदव्युत्तर विभागातील आजी माजी विद्यार्थ्यांची संस्था असून यात बहुतेक समाजाच्या विविध स्तरातील व विविध विभागातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दीक्षाभूमीवरील आंबेडकर कॉलेज सर्वोत्कृष्ट म्हणून गणल्या गेले त्याच पद्धतीने जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या दीक्षाभूमी चा विकास सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून व्हावा व त्यासाठी शासनाने जमीन व अर्थसाह्य देऊन मदत करावी अशीही अपेक्षा महाराष्ट्र स्तरावरील बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशनने आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.
– उत्तम शेवडे, सचिव
बुद्धिस्ट स्टुडन्ट असोसिएशन नागपूर महाराष्ट्र