दुर्गा मंदिरात भजन संध्या

नागपूर :-प्रताप नगरातील दुर्गा देवी मंदिरात अयोध्येतील श्रीरामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पवनीच्या कहू परिवारातर्फे भजन भक्ती गीतांचे सादरीकरण करण्यात आले.

गणेश वंदनेने सुरुवात करून देवीच्या गोंधळाने कार्यक्रमाची समाप्ती झाली. या निमित्ताने भक्तमंडळींना भक्ती गीताद्वारे आयोध्येचे निमंत्रणही देण्यात आले.

कार्यक्रमात गजानना श्री गणराया (कोरस), पायोजी मैने राम रतन धन पायो (विजया दफ्तरी), कानडा राजा पंढरीचा (मनीषा हिर्डे), जय रघुनंदन जय सियाराम (अपर्णा प्रभुणे), दुनिया चले ना श्रीराम के बिना (कोरस), खेळ मांडीयेला वाळवंटी नाचू (मंजूषा हिंगे), कुठे शोधिसी रामेश्वर (चारुदत्त कहू), नादातूनही नाद निर्मितो (मिताली काशीकर), लुटा लुटा आनंद लुटा (अश्विनी चाटी), ध्यान लागले रामनामी हो (मोहिनी सुतवणे), नाना आले नाना आले (कोरस), अंजनीच्या सुता तुला (चारुदत्त कहू, राजेश डाखळे), आई भवानी तुझ्या कृपेने (वल्लरी हिंगे) आणि श्री रघुवर जी की अवधपुरीने ही भजने आणि भक्ती गीते सादर करण्यात आली.

समूहगीते निनाद काशीकर, मधुरा काशीकर, सरिता कहू आणि अंजली अलकरी यांनी सादर केली. राजेश डाखळे यांनी हार्मोनियमवर, भावेश डाखळे यांनी तबल्यावर तर ओंकार डाखळे यांनी मायनरवर साथसंगत केली. दुर्गा मंदिराचे अध्यक्ष श्याम काळे यांनी आभार प्रदर्शन केले. मंदिर समितीचे विजय भट, रवी कुलकर्णी, अशोक भाटवडेकर, विजय पडोळे, नितीन डोळके, माधुरी पडोळे, स्नेहा काळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीतांना अटक

Mon Jan 15 , 2024
-पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई रामटेक :- अंतर्गत ०७ कि. मी. अंतरावरील मनसर चौक रामटेक येथे दिनांक १३/०१/२०२४ चे ००.४५ वा. ०१.४५ वा. दरम्यान रामटेक पोलीस पथक मन्सर परिसरात पेट्रोलींग करित असता, मुखबिरद्वारे माहीती मिळाली की, एक लाल रंगाचा आयसर ट्रक मध्ये रामटेक कडून मनसर गावाकडे अवैधरित्या जनावरांची अवैधरीत्या वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या विश्वसनिय माहिती वरून मनसर चौकात नाकाबंदी करून […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com