पंतप्रधान यांचा अपमान करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.
पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याकरिता निवेदन
रामटेक -राष्ट्रपती पंतप्रधान आणी राज्यपाल तथा मुख्यमंत्री ही महत्वाची पदे असतात .त्यावर विराजमान व्यक्तीचा नेहमी आदर व सन्मान करणे प्रथम कर्तव्य आहे .आणि तो करायलाच हवा. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बद्दल आक्षेपार्ह विधान केले त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल सर्वत्र संतप्त पडसाद उमटले आहेत .
भाजप महिला आघाडी तर्फे निषेध करण्यात आला व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, नाना पटोले यांना अटक करण्यात यावी या करीता रामटेक उपविभागीय पोलिस अधिकारी यांना भाजप महिला आघाडी अध्यक्ष ज्योती कोल्लेपरा यांचा नेतृत्वात निवेदन देण्यात आले…..भाजप महिला आघाडी तर्फे नाना पटोले यांचे बॅनर वर लिपस्टिक काजळ लावून साज शृंगार करून त्यांनी केलेल्या अक्षेपार्य वक्तव्याचा बहिष्कार करण्यात आला.
या वेळी प्रामुख्याने भाजप महिला आघाडीच्या अध्यक्ष ज्योती कोलेपरा , नगरसेविका लता कांबळे, उज्वला धमगाये,अनिता दियेवार, सविता बांते , शोभा अडामे, मीनल भारंबे, , संगीता बांते , कुंदा वांढरे, संगीता दुबे, संध्या सिंगाडे, मेघा ठाकरे, अर्चना बंगैया, ललिता धमगाये उपस्थित होते….