रमानगरात आधार कार्ड शिबिराचे आयोजन 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- प्रभाग 15 रमानगर येथे त्रेयलोक्य बौद्ध सहायक गण द्वारा संचालित अविष्कार बालवाड़ी केंद्रात आजादी चा अमृत महोत्सव अंतर्गत आधार कार्ड अपडेट करण्याचे दोन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळण्या साठी आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक असल्याचे मत माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी यावेळी व्यक्त केले, सपना मडामे, विद्या बोंबले, जया मेश्राम, सुकेशिनी गजभीये, सुरेखा रंगारी, सपना भिमटे प्रामुख्याने उपस्थित होते

शिविरात नवे आधार कार्ड नोंदणी, आधार कार्ड मधे मोबाइल नंबर अपडेट,जन्म तारीख दुरुस्ती, नाव दुरुस्ती, एड्रेस दुरुस्ती चे कार्य करण्यात आले. शिबिरात 80 नागरिकांनी याचा लाभ घेतला

CSC आधार केंद्र चे प्रतिनिधि 

अलंकार नगरकर, अल्केश्वर लांजेवार, आरती तितरमारे आणि शंकर चवरे, ऋषि दहाट, रतन रंगारी, राम मडावी,ऋषिकेश वानखेड़े, विनोद बंसोड, मुकेश गोंडाने, प्रकाश टेंभरे, सुरेश खोबरागड़े, विक्की चव्हान, मनीष रामटेके, उज्ज्वल रायबोले यांनी सहकार्य केले

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com