संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-प्रभाग 15 तील आनंद नगर भागात गत तीन चार महिन्यापासुन अपुरा पाणी पुरवठा होत असून दोन दिवसात तांत्रिक अड़चन दुर करून पाणी पुरवठा पुर्ववत करावा अन्यथा रविवारी नगर परिषद प्रांगणा तील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी निवेदना द्वारे नगर परिषद प्रशासना ला दिला आहे.
या पूर्वी मुख्याधिकारी संदीप बोरकर, पाणी पुरवठा अधिकारी अविनाश चौधरी यांना निवेदने दिली पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही पाईपलाईन देखभाल दुरुस्ती करणारा कंत्राटदार न प प्रशासनाला जुमानत नसलयाने ही समस्या ओढावल्याचे माजी नगरसेविका संध्या रायबोले, भाजपा कामठी महामंत्री उज्वल रायबोले यांनी स्पष्ट केले
5 एप्रिल 23 ला पाणी टंचाई ने त्रस्त महिलासह नगर परिषद मुख्याधिकाऱ्याना निवेदन दिले, मुख्याधिकाऱ्यानी कंत्राटदाराला समोर बोलाऊन आवश्यक निर्देश दिले परंतु त्या आदेशाला कंत्राटदाराने कचऱ्याची टोपली दाखवली असा आरोप भाजपा शहर महामंत्री उज्वल रायबोले यांनी आहे
रविवार 14 मे ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा कृपाल तुमाने, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे,आ टेकचंद सावरकर यांच्या हस्ते पट्टे वाटप होणार असून त्या वेळीच ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे माजी नगरसेविका संध्या रायबोले यांनी कळविले आहे ठिय्या आंदोलनात त्रस्त महिला देखील सहभागी होतील.