सेंट जोसेफ, प्रोव्हिडन्सला विजेतेपद, खासदार क्रीडा महोत्सव : थ्रोबॉल स्पर्धा

नागपूर :- खासदार क्रीडा महोत्सवातील थ्रोबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये सेंट जोसेफ आणि प्रोव्हिडन्स संघाने पूल ‘ए’ आणि पूल ‘बी’ गटातून विजेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.

दिघोरी येथील बिसरा मैदानामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. बुधवारी (ता.24) 17 वर्षाखालील मुलींच्या पूल ‘ए’ गटात सेंट जोसेफ संघाने सीडीएस संघाचा 17-16, 15-07, 15-12 असा तीन सेटमध्ये पराभव करून विजेतेपदावर नाव कोरले. तर पूल ‘बी’ गटात प्रोव्हिडन्स संघाने सेंट उर्सुला संघाला 15-3, 15-5 अशी मात देत स्पर्धेचे जेतेपद पटकाविले.

पूल ‘ए’च्या उपांत्य फेरीमध्ये सेंट जोसेफ संघाने व्हीएनसी संघाचा 15-1, 15-6, 12-15 असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले होते. तर सीडीएस संघाने ई पाठशाला संघाला 11-15, 15-13, 15-3 ने पराभवाचा धक्का देत सेंट जोसेफ संघाचे आव्हान स्वीकारले होते. पूल ‘बी’ मध्ये प्रोव्हिडन्स संघाने ई पाठशालाचा 15-02, 15-03 ने तर सेंट उर्सुला संघाने एस.ओ.एस ला 15-12, 15-11 ने मात देत अंतिम फेरी गाठली होती.

आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन

बुधवारी सकाळी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी भाजपा दक्षिणचे महामंत्री विजय आसोले, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण सहावे, सचिव मुरली मुरारकर, खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबुलकर, स्पर्धेचे सहसंयोजक डॉ. सौरभ मोहोड, समन्वयक किरण दातीर, वैशाली तिडके आदी उपस्थित होते.

निकाल

मुली : पूल ‘ए’

अंतिम लढत : सेंट जोसेफ मात सी.डी.एस (17-16, 15-07, 15-12)

उपांत्य फेरी :

सेंट जोसेफ मात व्ही.एन.सी (15-1, 15-6, 12-15)

सी.डी.एस मात ई पाठशाला (11-15, 15-13, 15-3)

व्ही.एन.सी मात ई पाठशाला (15-2, 15-25)

सी. डी.एस मात विद्या निकेतन (17-15, 15-4)

सेंट जोसेफ मात ई. पाठशाला (15-3, 15-8)

पूल ‘बी ’

अंतिम लढत : प्रोव्हिडन्स मात सेंट उर्सुला (15-3, 15-5)

उपांत्य फेरी :

प्रोव्हिडन्स मात ई पाठशाला (15-02, 15-03)

सेंट उर्सुला मात एस.ओ.एस (15-12, 15-11)

एसओएस मात ई पाठशाला (15-1, 15-1)

सेंट उर्सुला मात ई पाठशाला (15-1, 15-5)

प्रोव्हिडन्स मात एस. ओ. एस (15-11, 15-2)

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारताचे संविधान हा आमचा आत्मा म्हणून संरक्षण करावे - अपर जिल्हाधिकारी चंद्रभान पराते 

Thu Jan 25 , 2024
नागपूर :- आदिवासी हलबा समाज विकास संस्थाच्या माध्यमाने श्रीगुरु कोलबास्वामी सांस्कृतिक सभागृहात हलबांचा स्नेह संमेलनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज ,बिरसा मुंडा ,महात्मा ज्योतिबा फुले , सावित्री फुले यांचा छायाचित्रास प्रमुख पाहुण्यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. हलबांचा स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोहर वाकोडीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विकास कुंभारे ,अपर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com