भरदिवसा घरफोडी, ७८,५०० रू.चा मुद्देमाल चोरी.

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी 

कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान (नागपुर ) : – पोलीस स्टेशन अंतर्गत प्रगती नगर सुपर टाऊन येथे भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात घुसुन सोने, दागिने व नगदी रूपया सह एकुण ७८,५०० रूप याचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान परिसरा त चांगलीच खळबळ व्यकत होत असल्याने कन्हान पोलीसांनी सोनु सहारे यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.२०) डिसेंबर ला दुपारी १२ वाजता दरम्यान सोनु आनंदराव सहारे वय ३१ वर्ष राह. प्रगती नगर गहुहिवरा रोड, सुपर टाऊन कन्हान हे आपल्या आई वडील व परिवारा सह घराला कुलुप लावुन काचुरवाही येथील वहिणी मरण पावल्यामुळे त्यांच्या रामटेक येथे अंत्य विधी करिता गेले होते. सोनु हे काचुरवाही येथे मय्यतीला पोहोचले असता अंदाजे दुपारी ३.२० वाजता दरम्यान त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या काकु सुनिता राजकुमार मेश्राम यांनी फोन करून सांगितले की ” तुमचा घराचा दरवा जा उघडा असुन दरवाज्याचे कुलुप तोडलेला आहे “. त्यामुळे सोनु व त्यांचे काका राजकुमार मेश्राम काचुर वाही येथुन आपल्या राहत्या घरी कन्हान ला परत आले. घरी आल्यावर सोनु ला घराचा दरवाजा उघडा दिसुन, दरवाज्या ला लावलेले कुलुप बाजुला पडलेला दिसले. सोनु ने घराच्या आत जाऊन पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त पडल्याचे दिसुन आले. बेडरूम मधिल लोखंडी आलमारीचा दरवाजा वाकले ला होता. आलमारीतील १) सोन्याचे पदक ५ ग्रॅम, २) सोन्याचे पदक ३ ग्रॅम, ३) सोन्याचे मनी १० ग्रॅम, ४) सोन्याच्या लहान काठी ५ ग्रॅम, ५) लहान काठीचे मनी २.५ ग्रॅम असा एकुण २५ .५ ग्रॅम सोन्याचे दागिने जुने किमंत अंदाजे ७३,५०० रू. व नगदी ५,००० रूपये असा एकुण ७८,५०० रू. किंमती चा मुद्देमाल कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी घराचा आत प्रवेश करून चोरू न पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी सोनु सहारे यांचे तक्रारीने पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३८०, ४१४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com