संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील अजनी येथील सेंट जियानेली कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्याचा स्कूलच्या वतीने गौरव करण्यात आला सेंट जियानेली कॉन्व्हेंट स्कूल मध्ये आठव्या वर्गात शिकणारी प्रांजल देवेंद्र येडे नी कोल्हापूर येथे झालेल्या झोन शालेय मैदानी स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात गोळा फेक (शॉट पुट) या प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला असून कोल्हापूर येथे होणाऱ्या सिबीएससी राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धेत महाराष्ट्र झोनचे प्रतिनिधित्व करणार आहे सोबतच याच शाळेतील सहाव्या वर्गात शिकणारी आराध्या संजय गीते नी बंगलोर येथे झालेल्या सिबीएससी शालेय झोन योगा स्पर्धेत 19 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक घेत सुवर्णपदक पटकविले असून तिची केरळ येथे होणाऱ्या सिबीएससी राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेसाठी निवड झाली असून आराध्या गीते व प्रांजल येडेचा प्राचार्य सिस्टर अर्चना यांचे हस्ते सुवर्णपदक व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी सचिव अर्पिता दुबे ,भोवरीचे माजी सरपंच देवेंद्र येडे, हेड कॉन्स्टेबल संजय गीते उपस्थित होते दोन्हीही खेळाडूंना क्रीडा शिक्षक हर्षल बडेल यांचे मार्गदर्शन लाभले