निती आयोग सदस्यांची महा मेट्रोला भेट

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)

• मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधत ; प्रकल्पाची केली पाहणी

नागपूर : निती आयोग शिष्टमंडळाने आज मेट्रो भवनला भेट देत महा मेट्रो द्वारे कार्यरत मेट्रो रेल प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. या शिष्टमंडळामध्ये महासंचालक डॉ.डी.जी.स्वरूप, अतिरिक्त महाव्यवस्थापक(प्रकल्प) ममता पांडे, वरिष्ठ सल्लागार (सीआयडीसी) संतोष नायर यांचा समावेश होता.

महा मेट्रोच्या वतीने आयोगाला तांत्रिक आव्हाने आणि यश व खरेदी प्रक्रीया आणि विकास कार्य यावर विस्तृत प्रस्तुतीकरण देण्यात आले. या सोबतच ५ डी- बीम आणि प्रॉपर्टी डेव्हलपमेंट बद्दल त्यांना माहिती प्रदान करण्यात आली तसेच आयोगाच्या सदस्यांनी गड्डीगोदाम,आनंद टॉकीज ब्रिज,रामझुला, वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलाची पाहणी करत महा मेट्रोने केलेल्या कार्याबद्दल प्रशंसा केली. महा मेट्रो द्वारे स्थापित वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपूल गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि आशिया स्तरावरील रेकॉर्ड बद्दल प्रशंसा केली.

यावेळी आयोगाने महा मेट्रोला महत्वाच्या सूचना दिल्या ज्यामध्ये :

• स्थानिक स्वराज्य संस्थाशी चर्चा करून महा मेट्रोने मेट्रो रेल व्हायाडव्कट दरम्यान उपलब्ध जागेमध्ये राईट ऑफ व्हे तयार करावा ज्यामुळे या मार्गावरील इतर केबल व युटिलीटी साहित्य याठिकाणी एकत्रित आणता येईल तसेच महा मेट्रोला याद्वारे महसूल देखील उत्त्पन्न होऊ शकेल.

• महा मेट्रो द्वारे प्रॉपर्टी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने करण्यात आलेली अंबलबजावणी अतिशय ऊत्तम असून इतर मेट्रोशी सदर माहिती प्रदान करावी जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल.

• तसेच नवी दिल्ली येथे निती आयोग तर्फे आयोजित प्रदर्शन मध्ये महा मेट्रो द्वारे तांत्रिकी आणि उल्लेखनीय कार्याची माहिती या ठिकाणी प्रस्तुत करण्यात यावी जेणेकरून इतर मेट्रो व संस्थाना याचा लाभ होऊ शकेल.

या दरम्यान महा मेट्रोच्या वतीने संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक(स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिल कोकाटे, संचालक(वित्त) हरेंद्र पांडे व इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ब्राह्मण बिझनेस नेटवर्किंग ग्लोबलच्या उद्यम कौस्तुभ पुरस्कारांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Tue Feb 14 , 2023
खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी ‘अमृत’ संस्था लवकरच सुरू होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाणे – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील हुशार मुलांसाठी विविध योजना, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्य करेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com