मुंबई :- भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कारसेवक व ज्येष्ठ छायाचित्रकार मोहन बने यांच्या हस्ते शुक्रवारी ध्वजारोहण तसेच भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी आ.श्रीकांत भारतीय, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश प्रवक्ते अतुल शाह, ओमप्रकाश चौहान , प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी, सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.