उद्योजकता आणि आरोग्य प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद

– विद्यापीठ पदव्युत्तर गृह विज्ञान विभागाचे आयोजन

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर गृह विज्ञान विभागाच्या वतीने शुक्रवार, दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी आयोजित एक दिवसीय उद्योजकता आणि आरोग्य प्रदर्शनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यापीठाचे माननीय कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या उपस्थितीत पदव्युत्तर गृह विज्ञान विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सबिहा वली यांच्या शुभहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

उद्योजकता आणि आरोग्य प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला कुलसचिव डॉ राजू हिवसे, पदव्युत्तर गृह विज्ञान विभागाच्या माजी प्रमुख डॉ. सबीहा वली, पदव्युत्तर गृह विज्ञान विभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव, संयोजक डॉ. वंदना धवड, आरोग्य प्रदर्शन प्रमुख डॉ. प्राजक्ता नांदे यांची उपस्थिती होती. विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात गृह विज्ञान विभागामध्ये आयोजित प्रदर्शनीत विविध एकुण २६ स्टाॅल्स लावण्यात आले होते. यामध्ये गृह विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या १२ स्टाॅल्सचा समावेश होता.

वैष्णवी कांबे ( दिवे ), नेहा ठाकरे ( लिफाफा), हिमांशा डोनेकर ( रोटी रुमाल), सेजल – प्रणाली (डेकोरेटिव्ह आर्टिकल), नेहा कनोजिया (पाऊचेस), मानसी (बाॅटल्स), विशाखा (फ्रेम्स), विशाखा उके (रोपटे), निकिता देशमुख (डेकोरेटिव्ह दिवे), डॉ. अनहिता रंदेलिया ( लेस, साडी, कुशन्स), स्नेहल फसाटे (ड्रेस मटेरिअल), प्रिती टेंभरे (डेकोरेटिव्ह प्राॅडक्ट), चित्रा मानापुरे (ज्वेलरी), सीमा बुब (कुर्ती, साडी, बास्केट), राजेश भोरगडे व निता ठाकरे (कोल्ड प्रेस ऑईल ड्रेस मटेरिअल), अपर्णा कुबडे (चकली मिक्स, ढोकला मिक्स, लोणचे), मिनू कथल (डेकोरेटिव्ह प्राॅडक्ट), अन्वी – रितिका (मंडाला आर्ट बुकमार्क), अंजू मोरे (होममेड चाॅकलेट), मिनाक्षी बागडे (गिफ्ट पॅक, ड्राय फ्रूट, कुकीज, चाॅकलेट), स्नेहा उईके (टी, काॅफी, प्री-मिक्स), दिव्या शेटे व ग्रुप (दिवे), रश्मी साखरकर (फ्रेम्स), निकीता पाटील (चाय सिड), भावना गुरुदासानी (डेकोरेटिव्ह तोरण), साधना कुकडे (फ्रेम्स) आदी विविध स्टाॅल्स लावण्यात आले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देत वस्तूंची माहिती घेतली.

आरोग्य प्रदर्शनीला प्रतिसाद

पदव्युत्तर गृह विज्ञान विभागामध्ये आयोजित आरोग्य प्रदर्शनीला चांगला प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनीला भेट देण्यासाठी आलेले विद्यार्थी, नागरिकांची यावेळी बोन मिनरल डेन्सिटी तसेच बाॅडी कंपोझिटर ॲनॅलायझर मशीनद्वारे तपासणी करण्यात आली. आरोग्य प्रदर्शन डॉ. प्राजक्ता नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. आयोजनासाठी डॉ. शुभदा जांभुळकर, मीनाक्षी सुरवाडे, रेवती सुकळीकर, कल्याणी रोडे, नयना महाडिक यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Rowing -Silver medal to Dattu Bhokanal

Wed Nov 1 , 2023
A total four medals earned Mapasa :- Maharashtra’s Dattu Bhokanal won a silver medal in Rowing at the National Games on Wednesday. Maharashtra also won silver in the men’s coxless four and bronze in the quadruple and double sculls. In rowing, Maharashtra won a total of four medals, two silver and two bronze. In the men’s individual scull category, international […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com