वेकोलिच्या बारूद दगानीने जुनीकामठी येथे घराचे स्लॅब कोसळले 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानच्या अति तीव्रतेच्या बारूद दगान (ब्लास्टिंग) मुळे जूनी कामठी येथील भाऊराव मारबते यांच्या घराच्या हॉलचे स्लॅब कोसळले. सुदैवाने त्यावेळी घरचे लोक बाहेर गेले असल्याने घरी कुणीही नसल्यामुळे जिवहानी टळली.

मंगळवार (दि.२६) मार्चला दुपारी २ ते २.३० वाजता दरम्यान वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानच्या अति तीव्रतेच्या बारूद दगान (ब्लास्टिंग) मुळे जूनिकामठी येथील भाऊराव मारबते यांच्या घराच्या हॉलचे स्लॅब कोसळले. सुदैवाने त्यावेळी घरचे लोक बाहेर गेले असल्याने घरी कुणीही नसल्यामुळे कुठलि ही जिवहानी झाली नाही. वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदानीत कोळसा काढण्याचे काम सुरू असुन अति तीव्रते च्या बारूद दगान (ब्लास्टिंग) मुळे वेकोलिच्या लगत असलेल्या जूनीकामठी, गाडेघाट, गोंडेगाव, घाटरोहणा गावात हादरे बसतात. तसेच ब्लास्टिंगमुळे होणाऱ्या कंपनमुळे घराच्या भिंतीना तडे जातात. याकरिता गावक-यात भितीचे वातावरण असु न ग्रामस्थांनी वेकोलि प्रशासनाला माहिती दिली आहे. परंतु वेकोलि अधिकारी गोंडेगाव खदान ची नसुन इंदर खदानची आहे. तर इंदर खदानची नसुन गोंडेगावची आहे. असे सांगुन चालढकल करित असल्याचे गावक ऱ्याचे म्हणने आहे. परंतु या दगानीने जिवित हानी झाल्यास कोण जवाबदारी घेणार असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांच्या चर्चेतुन सामोर येत आहे.

वेकोलि कामठी व गोंडेगाव उपक्षेत्र अंतर्गत कामठी, इंदर व गोंडेगाव या तिन खुली कोळसा खदा न मध्ये अति तीव्रतेच्या बारूद दगान (ब्लास्टिंग) मुळे माती, कोळसा काढण्याचे काम जोरात सुरू असुन माती डम्पींग मुळे उंचच उंच मातीच्या टेकडया निर्माण करित असल्याने कोळसा मिश्रित माती धुळ व पाणी प्रदुर्शनाने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असुन लोकांचे आरोग्य धोक्यात आहे. कन्हान, पिपरी, कांद्री, टेकाडी, गाडेघाट, जुनिकामठी, घाटरोहणा परिसरातील ग्रामस्थांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. याअगोदर शनिवार (दि.२८) जाने वारी २०२३ ला दुपारी खुली कोळसा खदानच्या दगा नीने जमिनीला हादरे बसुन दुपारी २ वाजता जुनिकाम ठी येथिल संजय धोत्रे यांच्या घरातील स्वयंपाकाचा ओटा कोसळला होता. घटनेच्या वेळी गॅस व शेगडी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. वेकोलि कामठी खुली खदानच्या दगानीमुळे (दि.२८) ऑगस्ट २०२३ ला हरिहर नगर कांद्री येथील दिवसा घर कोसळुन कमलेश कोठेकर वय ३५ वर्ष व सहा महिन्याची मुल गी यादवी या बाप लेकीचा मुत्यु झाला होता. जुनिका मठी येथील दुसरी घटना असुन या एका वर्षातील तिसरी घटना घडल्याने आता तरी शासन प्रशासन वेळीच दखल घेत वेकोलि खुली खदानच्या अति तिव्र तेच्या दगानीवर निर्बधन लावुन परिसरातील नागरिकां ना भयमुक्त करून न्याय देण्याची मागणी चर्चेतुन जोर धरू लागली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भीम सेना तर्फे लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी घोषित

Fri Mar 29 , 2024
नागपूर :- नागपूर लोकसभा मधून श्रीधर नारायण साळवे / रामटेक लोकसभा मधून आशिष भाऊराव सरोदे / भंडारा गोंदिया लोकसभे मधून योगेश ज्ञानेश्वर नारनवरे / चंद्रपूर लोकसभेमधून विद्यासागर कालिदास कासर्लावार आणि गडचिरोली चिमूर मधून सुहास उमेश कुमरे यांना लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये महाराष्ट्र प्रदेश प्रभारी योगेश बालकदास गजभिए यांनी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहे. Follow us on Social Media x […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com