कर्करोग तपासणी शिबिराला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

– स्व. भानुताई गडकरी संस्थेचा उपक्रम : शेकडोंनी करून घेतले निदान

नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने व केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपुरात सुरू करण्यात आलेल्या निःशुल्क कर्करोग तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शेकडो नागपूरकरांनी यात सहभागी होऊन तपासणी करून घेतली आहे.

आतापर्यंत उत्तर, दक्षिण व मध्य नागपूरमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी निदान करून घेतले आहे. ३० डिसेंबरला ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. या अंतर्गत गर्भशयमुख कर्करोग, स्तन कर्करोग, मुख कर्करोग, ट्युमर आदींची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. वर्ल्ड कॅन्सर केअर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल आणि गुरुद्वारा प्रबंधन कमिटी यांच्या सहकार्याने मेमोग्राफी टेस्ट, पेप स्मियर टेस्ट, पीएसए टेस्ट, ब्लड कॅन्सर टेस्ट, सीईए टेस्ट देखील करण्यात येत आहे.

आतापर्यंत उत्तर नागपुरातील गुरुनानक पुरा, महाल येथील स्व. तुषार मोरघडे क्रीडा मैदान, सक्करदरा चौकातील मोहता सायन्स कॉलेज याठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. माजी आमदार डॉ. मिलिंद माने, बंटी कुकडे, विष्णू चांगदे, गणेश कानतोडे, भोजराज डुम्बे, अश्विनी जिचकार, रामभाऊ आंबुलकर, श्रीकांत आगलावे, विजय असोले, परमिंदर सिंग विज, ओंकार सिंग, हनी भंडारा, डायमंड सिंग, बाजवा, नवनितसिंग, अजय मुखर्जी, शिवानी गर्ग, डॉ. अलिना घाटोळे, डॉ. शादाब अहमद, डॉ. हमायरा अंसारी, डॉ. राजेश मुरकुटे, प्रांजल मोटघरे, डॉ. तुषार, डॉ. श्रीरंग, डॉ. अजय, डॉ. अरशद, डॉ. बोलने, डॉ. प्रतिक यांच्या विशेष सहकार्याने हे आयोजन होत आहे. शिबिराचे मुख्य संयोजक डॉ. गिरीश चरडे यांच्यासह स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.

आगामी शिबिरे

पूर्व नागपूर : ४ जानेवरी : भवानी माता मंदिर, पारडी

पश्चिम नागपूर : ५ जानेवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र, प्रेरणा नगर

दक्षिण-पश्चिम नागपूर : ६ जानेवारी : लक्षवेध, नरेंद्र नगर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वतंत्रा सेनानी स्व.पंडित त्रियोगी नारायाण (जुग्गा महाराज) स्मृति सिनियर मार्निग हॉकी ग्रुप 7 ए साईड हॉकी प्रतियोगिता

Thu Jan 4 , 2024
– लालबाग व सिटी क्लब की विजयी सुरुवात* राजनांदगांव :- सीनियर मॉर्निग हॉकी ग्रुप के द्वारा आयोजित सीनियर मॉर्निंग ग्रुप 7 ए साइड हॉकी प्रतियोगिता का शुभारंभ नरेश डाकलिया पूर्व महापौर के मुख्यातिथ्य फ़िरोज़ अंसारी अध्यक्ष छत्तीसगढ़ हॉकी के अध्यक्षता भूषण सॉव के विशिष्ठ आतिथ्य में सम्प्पन हुआ आज के समरोह में मुख्यअतिथि ने अपने उध्बोधन में कहा कि ऐसे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com