ताजधाम पागलखाना येथील सालाना उर्स निमित्त वाकी दरबार कडून आज शाही संदल निघणार

नागपूर :- येथील ताजधाम पागलखाना शरीफ येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालांना उर्स २९ मार्च पासून सुरू होत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाकी दरबार ट्रस्ट कडून ताजधाम पागलखाना नागपूर येथील हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या सालाना उर्स निमित्त २९ मार्च ला शाही संदल काढण्यात येत आहे २९ मार्च ला सकाळी १०.०० वाजता वाकी दरबार येथून शाही संदल निघून ताजधाम पागलखाना नागपूर येथील वाकी दरबार यांच्या डेऱ्यावरती पोहोचेल तिथे कव्वालीचा कार्यक्रम होऊन तेथून ठीक ५.०० वाजता ताजधाम दरबार कडे निघेल दरबारामध्ये पोचून बाबांना चादर फुल अत्तर अर्पण करून सर्व भक्तांसाठी प्रार्थना करण्यात येईल व नंतर महाप्रसादाचे वितरण होईल.

रोज ३० ,३१ मार्चला सकाळी ९.०० वाजता नाश्ता चहा वितरण होईल व दुपारी महाप्रसादाचे वितरण होईल.

सर्व भक्तांनी या शाहीसंदल मध्ये शामिल होऊन बाबासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा अशे आव्हान ट्रस्टचे अध्यक्ष तथा सज्जादा नशीन, प्रभाकर डहाके पाटील यांनी केले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिष्यवृत्ती, शुल्क, विद्यावेतनासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Fri Mar 29 , 2024
यवतमाळ :- अनुसूचित जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क प्रदाने, राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती योजना इत्यादी योजना राबविण्यात येत आहे. या शैक्षणिक वर्षातील या योजनांचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com