संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ
कामठी :- कामठी नगरपरिषद च्या वतिने १५ व १६ फेब्रुवारी रोजी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या दोन दिवसीय विकसित भारत संकल्प यात्रेतून नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला.
केंद्र शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवन्याकारिता विकसित भारत संकल्प यात्रा या मोहिमेचे शासनातर्फे आयोजन करण्यात आलेले होते.ही यात्रा दिनांक १५ फेब्रुवारी २०२४ वार गुरुवार दुपारी ३ वाजता सीरिया मैदान कामठी व दिनांक १६ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता प्रभाग क्र 14 येथील कळमना रोड वरील डॉ बाबासाहेब मैदान कामठी व दुपारी ३ ला ड्रॅगन पॅलेस कामठी येथे आयोजित करण्यात आले होते . सदर मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना आकर्षक एलईडी वाहनाद्वारे माहीती देत तसा लाभही देण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल लावून नागरिकांना योजनांची माहिती देणारी पुस्तिकाही देण्यात आली.या विकसित भारत संकल्प यात्रेत केंद्र शासनाच्या विविध योजना ,प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना, बैंकमार्फ़त विविध कर्ज योजना,आधार अपडेट,आरोग्य शिबीर, इ विविध योजनाची नागरिकांना माहिती देत लाभ देण्यात आला.
ही दोन दिवसीय विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वीरीत्या पार पडली असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामठी नगर परिषद चे मुख्यअधिकारी व प्रशासक संदीप बोरकर , उपमुख्याधिकारी आबासाहेब मुंढे, रंजीत माटे,प्रदीप भोकरे, विजय मेथीयां, ,रुपेश जैस्वाल,प्रदीप तांबे, विशाल गजभिये आदी कार्यालयिन अधिकारी कर्मचाऱ्यानी मोलाची भूमिका साकारली.