सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळा वाठोडा येथे सामाजिक न्याय विभाग स्थापना दिवस उत्साहात

नागपूर :- सामाजिक न्याय विभाग अंतर्गत येणाऱ्या सफाई कामगार मुलामुलींची शासकीय निवासी शाळा वाठोडा नागपूर येथे 90 व्या सामाजिक न्याय विभाग स्थापना दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीतील विचारवंत साहित्यिक कार्यकर्ते वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम चे अध्यक्ष स्नेहल शंभरकर, मुख्याध्यापक यांनी भूषवले तसेच शाळेचे अधीक्षक शुभांगी खापेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातिला शाहू फुले आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेला मल्यारपण करण्यात आले प्रमुख पाहुण्याचे शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात प्रभाकर दूपारेंनी गौतम बुद्धाची शिकवण कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितली तसेच शिक्षणाचे महत्व आणि व्यक्तिमत्व विकास या बाबत मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात स्नेहल शंभरकर यांनी “वाचाल तर वाचाल” या विषयावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण कौंडलकर यांनी केले. सूत्रसंचालन विशाखा गणोरकर यांनी केले तर आभार रजनीकांत नंदनवार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांची घोडबंदर रोड येथे श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाला भेट

Sun Oct 16 , 2022
ठाणे :-  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज स्वस्तिक मैदान, घोडबंदर रोड, ठाणे येथे आयोजित श्रीमद भागवत कथा ज्ञान महायज्ञ व संत संमेलनाला भेट देऊन कथा श्रवणाचा लाभ घेतला. यावेळी राज्यपालांनी कथाकार देवकीनंदन ठाकूर (वृंदावन) यांना वंदन केले व आरती केली. भागवत कथा यज्ञाचे आयोजन श्याम सरकार व श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ समिती, ठाणे यांनी केले होते. यावेळी विधान परिषद सदस्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights