संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-‘स्वच्छ सुंदर -माझे गाव’करण्याचा संकल्प – सरपंच योगिता किशोर धांडे
कामठी :- गावातील सर्व नागरिकांच्या सहकार्यानेच आपण एक आदर्श व स्वच्छ गाव निर्माण करू शकतो हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. तेव्हा संत गाडगेबाबा महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तेने सहभाग नोंदवावा असे आवाहन खैरी ग्रामपंचायतच्या सरपंचा योगिता किशोर धांडे यांनी खैरी गावात सुरू असलेल्या ग्राम स्वच्छता अभियान सप्ताह प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी संपूर्ण गावाची ग्रामस्वछता करण्यात आली. दरम्यान या ग्रामस्वछता अभियानात सहभागी झालेले ग्रा प उपसरपंच,सदस्यगण,गावातील जागरूक नागरिक गण या सर्व सहभागी झालेल्या नागरिकांचा मी ग्रामपंचायत खैरीच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचे सरपंच योगिता किशोर धांडे यांनी जाहीर केले.तसेच गावातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की आपापल्या घरासमोरीलबव किमान आजू बाजूचा परिसर स्वच्छ ठेवावे ,रस्त्यावर गुरे ढोरे बांधू नये,रस्त्याच्या बाजूला शेंण खताचे खड्डे करू नये,गावाच्या विकासाला सहकार्य करावे ,आपल्या गावाचा दर्जा सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सामूहिक योगदान दिल्यास आपले गाव हे आदर्श ग्राम म्हणून नक्कीच ओळखल्या जाईल असेही मत सरपंच योगिता किशोर धांडे यांनी व्यक्त केले.
तर या ग्राम स्वछता अभियानात खैरी गाव सुंदर,स्वच्छ व रोगमुक्त करण्याकरिता सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यगंण, ग्रामपंचायत कर्मचारीगण,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर,मनरेगा कर्मचारी आदीनी सहभाग नोंदवून मोलाची भूमिका साकारली.