जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अटक, सात लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त

नागपूर :- फिर्यादी किशोर समाधान भांदर्गे, वय ३७ वर्षे, रा. धोत्रा, भंडगोजी, ता. चिखली, जि. बुलडाणा यांना त्यांचे परीचयाचे शुभम साखळीकर, रा. चिखली, बुलडाणा यांनी नागपुर, वर्धमान नगर येथील गोपी जोशी यांचे कार्यालयात जावुन ते देतील ती रक्कम घेवुन येण्यास सांगीतले होते. फिर्यादी हे त्यांचे मित्र नामे अमोल काकडे यांचेसह नागपुरला आले व गोपी जोशी यांचे कार्यालयातुन ११,९०,०००/- रू. रोख घेतले व परत बुलडाणा येथे जाण्याकरीता दिनांक २६.०८.२०२४ चे १९.०० वा. चे सुमारास ओला कॅबने पोलीस ठाणे धंतोली हद्दीतील बावा ट्रॅव्हल्सचे समोरील रोडवर, वर्धा रोड, नागपुर येथे पोहचले. तेव्हा अचानक एका पल्सर बाईकवर आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी फिर्यादीस गाडीचा काच उघडण्यास सांगीतला. फिर्यादीने काच उघडला असता, आरोपींनी फिर्यादीस चाकुचा धाक दाखवुन ठार मारण्याची धमकी देवुन पैशाची बॅग हिसकावली व बाईक ने पळून गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे धंतोली येथे कलम ३०९ (४), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचे तपासात धंतोली पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन, सखोल तांत्रीक तपास चंद्रकांत झाडे, वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. १०३, नरेंद्र नगर, अजनी, नागपुर २) निखील राजु श्रीवास, वय २१ वर्षे, रा. खरबी टि-पॉईंट, बाठोडा, नागपुर ३) अभीषेक लोकेंद्र विश्वकर्मा, वय २१ वर्षे, रा. छापरू नगर, लकडगंज, नागपुर ४) गौरेश जितेंद्र भुते, वय २० वर्षे, रा. श्रीकृष्ण नगर, नंदनवन, नागपुर ५) हार्दीक राजु ठोसर, वय २१ वर्षे, रा. गरोचा मैदान, लकडगंज, नागपुर ६) आशिष अमरेश पांडे, वय २१ वर्षे, रा. राजेंद्र नगर, नंदनवन झोपडप‌ट्टी, नागपुर ७) सौरभ देवानंद सहारे, वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. १३५, जुना बगडगंज, नागपुर यांना ताब्यात घेतले. आरोपींचे ताब्यातुन पल्सर २२० वाहन क. एम.एच. ४९ दि. ३१७० व पल्सर एन.एस. १५० क. एम.एच. ४९ सि. ई. ६९५० तसेच, रोख ६,००,०००/-रू, असा एकुण ७,००,०००/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांची दिनांक ३१.०८.२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. पाहीजे आरोपी क. १) कैलास पुसदकर, रा. गरोबा मैदान २) दुर्गेश इंगोले, रा. बगडगंज, नागपुर यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस आयुक्त, नागपुर शहर, सहपोलीस आयुक्त, नागपुर शहर, अपर पोलीस आयुक्त (उत्तर प्रभाग) नागपुर शहर, पोलीस उप आयुक्त्त (परी. २) नागपुर शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त (सिताबर्डी विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली, वपोनि, विनायक कोळी, सपोनि, संकेत चौधरी, पोउपनि, धनाजी मारकवाड, पोहवा. सुभाष वासाडे, प्रशांत इंगोले, नापोअं. अमोल लोणकर, पोअं. मनोज सोनावने, माणिक दहीफळे, विनोद चव्हान, भुवनेश्वर मोहड, चेतन भोळे, ऋषभ निशीथकर, तसेच, पोलीस ठाणे सदर येथील पोअं, विक्रम ठाकुर यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हद्दपार ईसमास अटक

Thu Aug 29 , 2024
नागपूर :- गुन्हेशाखा युनिट क. ४ ने अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाणे नंदनवन हद्दीत आरोपी तपासणी मोहीम राबवित असतांना, त्यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. १३ येथे राहणारा हरपार आरोपी नामे पंकज उर्फ चिलचिल्या सुरेशराव शिदि, वय ३० वर्षे हा घराजवळील कोपऱ्यावर दिसुन आल्याने त्यास घेराव टाकुन ताब्यात घेतले. आरोपी यास मा. पोलीस उप आयुक्त परि. क. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com