महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
नागपूर: उद्या आणि परवा (५ आणि ६ मार्च रोजी – रविवार आणि सोमवार) खापरी जवळ विश्व मानव रुहानी केंद्राचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होणार आहे. खापरी येथे आयोजित या मेळाव्यात सहभागी होत नागपूरला परत येणाऱ्या भाविकांच्या सोई करता नियमित सेवे नंतर नागपूर मेट्रो ची प्रवासी सेवा ५ मार्चच्या मध्य रात्री नंतर १ वाजता पर्यंत सुरु असेल. खापरी येथून सीताबर्डी इंटरचेंज, झिरो माईल फ्रीडम पार्क, कस्तुरचंद पार्क स्टेशन दरम्यान हि सेवा असेल.
सोबतच मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मार्च रोजी नियमित वेळे नंतर मेट्रो सेवा रात्री ११ वाजे पर्यंत सुरु असेल. या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसह इतर मेट्रो प्रवासी देखील या दोन दिवस वाढीव प्रवासी सेवेचा लाभ घेऊ शकतात. प्रवाश्यांचं सोइ करता नागपूर मेट्रोने सर्व आवश्यक ती काळजी घेतली असून योग्य त्या सूचना मेट्रो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.