तर….
तुम्ही आमच्या आई- बापाचा अपमान करणार आणि आम्ही तुमच्यावर बोललो की आम्हाला अहिंसा आणि कायदा याचे तत्त्वज्ञान देणार.
चला, तुम्ही म्हणता तसे करू…कायद्यात बोलू.
अंगावर शाई फेकली आणि निषेध नोंदवला यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न आला कुठून ..?
बरं , असे म्हणू की त्या शाईमध्ये काही मिसळले असेल त्याने जीवाला धोका निर्माण झाला असेल म्हणून गुन्हा नोंद केला…असे असेल तर केमिकल अनलिसिस न करताच ते सेक्शन का लावले ? आणि केमिकल अनलिसिस केले आहे , तर कधी आणि इतक्या तात्काळ कसे ?
ते एका कार्यकर्त्यांच्या घरातून बाहेर येत होते, मग हा सरकारी कामात अडथळा कसा ? आणि कार्यकर्त्यांच्या घरात किंवा अंगणात सरकारी काम ते कसले..?
म्हणजे कायदा पाळणारी यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे म्हणजे तुम्ही कायदा कसाही वापरणार तर…
मग कायदा तुम्ही हवा तसा वापरणार असताल तर त्याचा वापर आम्ही करून फलित काय मिळणार ?
राहिला सवाल हिंसेचा…किंवा अहिंसेचा…
तुम्ही रोज बोंबलत असता ना स्वातंत्र्य फक्त चरख्याने मिळाले नाही तर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदानामुळे मिळाले आहे…
आम्ही पण तेच सिद्ध केले…आम्ही आहोत भगतसिंग यांचे अनुयायी…
“बहरों को सुनाने के लिए धमाके की जरूरत होती है”: भगत सिंह यांचेच तर म्हणणे आहे…
गेली कित्येक दिवस निषेध नोंदणी केली जात आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करत होतात, आता केला एक धमाका, कशी जाग आली बरं….
सोयीने कायदा , हिंसा आणि अहिंसा वापरण्यात पटाईत असलेल्याहो एक गोष्ट ध्यानात ठेवा….
अहिंसेचे तत्वज्ञान जगाला दिलेला बुद्ध आमचा मार्गदर्शक आहे
आणि देशाला कायदा दिलेले बाबासाहेब आमचे बाप…
आणि बहिऱ्याला ऐकू येण्यासाठी आवाज काढणारा भगतसिंग आमचा भाऊ….
तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका, तुम्ही शहाणपणाने वागा….
– अधिवक्ता महेश भोसले
@ फाईल फोटो