संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र 15 येथील आनंद नगर परिसरात मागील 20 दिवसापासून तांत्रिकीय अडचणीतून नळाला अपुरा पाणी येत नसल्याने पाण्याचा ठणठणाट आहे.परिणामी परिसरातील नागरिकांना तेव्हा ही तांत्रिकीय बाब निदर्शनास आणून देत तांत्रिकीय दुरुस्ती करून समस्या मार्गी लागावे या मागणीसाठी माजी नगरसेवक नीरज लोणारे यांच्या नेतृत्वात मुख्यअधिकारी संदीप बोरकर यांना सामूहिक निवेदन देण्यात आले.निवेदन देताच मुख्यअधिकाऱ्यानी सदर निवेदन गांभीर्याने घेत पाणी पुरवठा अभियंता अवी चौधरी यांना तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आदेशीत केले,त्यानुसार सदर तांत्रिकीय अडचण दूर करण्यात प्रशासनाने गती दिली असून काम प्रगतीपथावर आहे.
निवेदन देताना पुष्पदास नागदेवें, कोमल लेंढारे, सत्यभामा वासनिक, कमलेश रामटेके, योगेश नागदेवें, बाबुराव नागदेवें, सतीश रामटेके, संदेश डोंगरे, सीता पटले, बंडू पटले, मुन्ना खरोले, ललित राऊत, पांडुरंग रामटेके, गोपाल नाग, सुमन बागडे, हरीश गिरी, रवी, निशु, सोन्या आदी नागरिक उपस्थित होते.