कन्हान :- भाविक मंच कांद्री-कन्हान व्दारे श्री दंत्त मंदीर कांद्री येथे हरिनाम भागवत सप्ताह सह श्री दत्तात्रेय जयंती महोत्सव निमित्य श्री दत्तात्रेय महाराज पालखी कांद्रीच्या मुख्य मार्गाने भ्रमण करताना जागो जागी स्वागत केले. तसेच जय शीतला माता मंदिर मेन रोड कांद्री कन्हान येथे जलोष्षात पुजा पाठ आणि अल्पोहार, प्रसाद वितरण करून स्वागत करण्यात आले.
शनिवार (दि.१४) डिसेंबर २०२४ ला सकाळी ११ वाजता श्री दत्त नगर कांद्री येथुन श्री दत्तात्रेय महाराज पालखी प्रस्थान करून कांद्रीच्या मुख्य मार्गाने भ्रमण करताना जागो जागी पुजन, अल्पोहार, चाय वितरण करित पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे शीतला माता मंदिर जे एन रोड कांद्री येथे विधिवत पूजन, प्रसाद, अल्पोहार वितरण करून भव्य स्वागत करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक कवडु जी आखरे, शोभाबाई नथ्थुजी वझे, हीराबाई वंजारी यांचे स्वागत कीर्ती हटवार, महेश मंगतानी हयांनी केले. स्वागत समारंभाच्या यशस्विते करिता शितला माता मंदीर कमेटीचे आयोजक संजय चौकसे, वामन देशमुख, वसंता राउत, प्रकाश ढोके, पारस मरघडे, बादल विश्वकर्मा, चंद्रशेखर बावनकुळे, गोकुल पटेल, रोशन बोरकर, सतिष मधुमटके, नरेश बावने, अशोक खैरकर , प्रेमचंद चौव्हाण, अशोक हिंगणकर, प्रेम नेवारे सह समस्त भाविक मंडळीनी सहकार्य केले.