शिवसेना तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

संदीप कांबळे, कामठी

नेत्र रोग तपासणी व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी ता प्र 21:- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौकात कामठी शिवसेना च्या वतीने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप इटकलवार यांच्या हस्ते विधिवत पूजन करून माल्यार्पण करून शिवस्तुती घेण्यात आली.याप्रसंगी आयोजित रक्तदान शिबिरात शेकडोच्या वर नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले तसेच नेत्र रोग निदान शिबिराचा शेकडो च्या वर नागरिकांनी सहभाग दर्शवित गरजू नागरिकांना चष्मे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नागपूर जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार, जिल्हा उपप्रमुख राधेश्याम हटवार,कामगार सेल जिल्हा उपप्रमुख राजेश रंगारी, कामठी शहर प्रमुख मुकेश यादव , भारतीय विद्यार्थी सेना चे विनोद यादव ,विराग जोशी, भरत नानेट ,शहर उप प्रमुख सुनील काटगाए, महादेव बावनकर ,हश मठीया, सुनील काटगाए, सुरज दास,गणेश सायरे, महेश तालेवार, कामगार सेना सुंदरसिंह रावत ,नगरसेवक राजू पोलकमवार ,नेहालसिंह चौधरी ,बनवारी यादव विद्यार्थी सेनाचे राजू चहांदे, बालू शुक्ला , मोनिस पिल्ले ,, देवेंद्र चकोले, प्रशांत खोब्रागडे , सौरभ जोशी,राजेश तूप्पट, नितीन हिवरेकर यासह मोठ्या संख्येत शिव सैनिक उपस्थित होते. तसेच महिला शिवसेना कार्यकर्ता ममता नायक ,सुल्ताना बेगम ,महिला कार्यकर्ता ची सुद्धा मोठ्या संख्येत उपस्थिती होती .दरम्यान भव्य महाप्रसाद वितरणाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

21 मार्च पासून कामठी में गायत्री परिवार द्वारा 108 कुंडीय यज्ञ का शुभारंभ

Mon Mar 21 , 2022
संदीप कांबळे, कामठी कामठी ता प्र 21:-स्वास्थ्य संवर्धन 108 कुण्डीय गायत्री महायज्ञ आयोजन समिति कामठी द्वारा आज दिनांक 21 मार्च को प्रातः 7 बजे से सभी देवताओं के आव्हान के साथ यज्ञ का शुभारंभ हुआ।सबेरे से ही यज्ञ में बैठने के लिए भक्तों का उत्साह देखते ही बनता था। सम्पूर्ण 108 कुंडों में प्रत्येक कुंड पर 4 जोड़े के हिसाब […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com