नागपूर :-दिनांक २०.०२.२०२४ चे ००.०० वा. ते दिनांक ११.०३.२०२४ चे १५.०० वा. चे दरम्यान, पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोबाभावे नगर, गल्ली नं. ५, प्लॉट नं. २१५, येथे राहणारे फिर्यादी निलेश देवनाच खापरे, वय ३५ वर्षे, हे घरी हजर असतांना त्यांनी इंस्टाग्रामवर एक जाहिरात बघीतली त्यामध्ये स्टॉक मार्केट मध्ये ५ ते १० टक्के नफ्या बाबत सांगीतले होते, त्यानंतर आरोपी क. १) जिया शंकर अॅडमीन यांनी फिर्यादीस पैश्याचे आमीष दाखवुन व्हॉट्सअॅप ग्रुपवर जॉईंट करून घेतले आरोपी क. १ चे साथीदार क. २) पुजा ३) आर्यन रेड्डी यांनी संगमणत करून फिर्यादीस वेगवेगळ्या ट्रान्जेक्शन आयडी देवून फिर्यादीस विश्वासात घेवुन त्यांना २६,८५,०००/- रू ऑनलाईन व आरटीजीएस द्वारे भरण्यास भाग पाडुन फिर्यादीस कोणत्याही प्रकारचा नफा किंवा मुद्दल परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे सपोनि तायडे यांनी आरोपीविरूद्ध कलम ४१९, ४२०, भा.दं.वि. सहकलम ६६ (क) आयटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपींचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.