संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी प्रतिनिधी १८ मे– प्रभाग पंधरा तील शिवनगर भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून रात्री असामाजिक तत्वा कडून तुफान दगडफेक करण्यात येत असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी असामाजिक तत्त्वावर कारवाई करून दगडफेक थांबवावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी कामठी शहर च्या पदाधिकाऱ्यांनी नवी कामठी पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांना दुपारी सोपविले प्रभाग 15 तील शिवनगर हा झोपडपट्टी एरिया असून तेथे पानावर आणून खाणारे नागरिक राहतात दिवसभर काबाडकष्ट करून घरी आल्यानंतर रात्री आठच्या नंतर घरावर असामाजिक कडून दगडफेक केली जाते.
येथील नागरिकांनी त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही शेवटी आज भाजपा कामठी शहराध्यक्ष संजय कनोजिया यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आणि नागरिकांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांची भेट घेऊन दगडफेक करणाऱ्या असामाजिक तत्वा वर कारवाईची मागणी केली
निवेदन देणारया शिष्टमंडळात भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया, महामंत्री उज्वल रायबोले, अनुसूचित जाती आघाडी अध्यक्ष विक्की बोंबले,माजी नगरसेवक लालसिंग यादव प्रामुख्याने उपस्थित होते
वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी दखल घेऊन याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शिवनगरात दगडफेक करणाऱ्या असामाजिक तत्त्वावर कारवाई करा भाजप शिष्टमंडळाचे निवेदन
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com