अनोळखी पुरूषाचा मृत्यु

मौदा :-  दि. २०/०३/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा. चे दरम्यान बोरगाव येथील पोलीस पाटील श्रावण सुर्यभान हटवार रा. बोरगाव पुल ता. मौदा जि. नागपुर यांनी पोलीस ठाणे मौदा येथे फोनद्वारे माहिती दिली की, नागपूर ते भंडारा जाणारे महामार्ग क्र. ५३ बोरगाव सूर नदीचे पुलाचे सुरुवातीस रोडचे कडेला एक २५ ते ३० वर्षे वयाचे पुरुषाचे प्रेत पडलेले आहे. अश्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. आर. राजपूत यांनी वरिष्ठांना माहिती देवून आपले अधिनस्त असलेले अधिकारी व अंमलदार यांचे ताफ्यासह घटनास्थळी जावून प्रेताची पाहणी केली असता प्रेत पालथ्या स्थितीत दिसुन आले तसेच त्याचे अंगावरील कपडे फाटलेले होते ज्यामध्ये काळया व पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व काळया रंगाची बनियान अर्धवट अंगामधुन मनगटापर्यंत निघालेल्या अवस्थेत होती. तसेच निळया रंगाचा जिन्स पँट व निकर टोंगळयाच्या खाली पर्यंत आलेली होती त्याचे शरीराचे हातावर, बोटावर, पाठीवर आणि पुष्ठभागावर खरचटुन मास निघालेले असून डोक्याचे मागील बाजुस घासलेले तसेच उजव्या कानाचे बाजुला सोलुन व छातीवरील भागास सोलुन मास निघालेल्या जखमा दिसुन आल्या.

नमूद मृतकाचे वर्णन खालील प्रमाणे –

एक अनोळखी मृतकाचे प्रेत २५ ते ३० वर्षे, चेहरा लांबट, केस काळे व कानाचे वरती बारीक कटिंग केलेले, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच वर्ण सावळा बांधा सडपातळ अंगावरील कपडे फाटलेले ज्यामध्ये काळया व पांढऱ्या रंगाचा चौकडा शर्ट व काळया रंगाची बनियान व निळया रंगाचा जिन्स पँट प्रेताचे उजव्या हातावर इंग्रजीमध्ये “WAMAN” असे गोंदलेले तसेच डाव्या हातावर वटवाघूळ सारखे दिसणारे चित्र गोंदलेले.

नमूद प्रकरणी ग्राम बोरगाव येथील पोलीस पाटील श्रावण सुर्यभान हटवार यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे मौदा येथे अप. क्र. ३२८/२४ कलम २७९, ३०४ (अ) भा.द.वि. अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. आर. राजपुत यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे पोलीस ठाणे मौदा हे करीत असून वर नमूद वर्णनाचे अनोळखी इसमाबाबत माहिती मिळून आल्यास पोलीस ठाणे मौदा येथे

खालील नमूद क्रमांकावर संपर्क करावे.

संपर्क क्र. –

१) पोनि एस. आर. राजपूत ८६६८२४३८९५

२) पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमार जगणे- ७७९८०३००६८

३) पोना रोशन पाटील – ८६६८८०९९०९

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ग्रामीण पोलीसांचा आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ तसेच सण व उत्सव संबंधाने रूट मार्च

Thu Mar 21 , 2024
नागपूर :- आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ ही शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी तसेच आगामी सन उत्सव छत्रपती शिवजयंती (तिथीनुसार), होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, इस्टर संडे हे सन शांततेत पार पडावे या करिता पोलीस स्टेशन जलालखेडा स्तरावरून रूट मार्च चे आयोजन करण्यात आले होते दरम्यान पोलीस स्टेशन जलालखेडा अंतर्गत काल दिनांक १९/०३/२०२४ रोजीचे १६/३० ते २०/०० वा. पर्यंत जलालखेडा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com