हद्दपार आरोपी शैलेश कडबे कांद्री ला राहताना कन्हान पोलीसानी अटक केली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- नागपुर जिल्हयातुन हद्दपार केलेला आरोपी शैलेश धनराज कडबे हा संताजी नगर कांद्री येथे किरायाने राहत असल्याने कन्हान पोलीसानी त्यास अटक करून १४२ मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्याची शिफारिश करण्यात आली आहे.

शनिवार (दि.१८) मे २०२४ ला सपोनि. राहुल चव्हाण, उपपोनि राठोड, सह पोहवा हरिष सोनबद्ररे, नापोशि अमोल नागरे, अनिल यादव, दिपक कश्यप असे सरकारी वाहनाने पैट्रोलिंग करित असताना गोप निय माहिती मिळाली कि मा. उपविभागीय दंडाधिका री रामटेक यांचे आदेश. फौ.मा.क्र. १०/२०२३ कलम ५६ (१) (अ) मु.पो.का. अन्वये शैलेश धनराज कडबे रा. बोथीया पालोरा ता. रामटेक जि. नागपुर यास नागपुर जिल्ह्यातुन सहा महिने करिता हद्दपार केले असताना तो इसम पो.स्टे. कन्हान परिसरात संताजी नगर कांद्री येथे वास्तव्य करित असल्याची खात्रिशिर माहिती मिळाल्याने धर्मराज शाळेच्या मागे संताजी नगर कांद्री च्या एका दुमजली घरी गेलो. त्या ठिकाणी कोणी अनोखी इसम नव्याने राहायला आला आहे का असे लोकांना विचारले असता तेथील लोकानी नेटाने एका इसमाकडे बोट दाखवुन हाच इसम असल्याचे सांगितले. तेव्हा जावुन त्याचे नाव विचारले असता त्यांनी शैलेश धनराज कडबे रा. बोथीया पालोरा ता. रामटेक जि. नागपुर असे सांगितल्याने आपण नागपुर जिल्ह्यातुन सहा महिने करिता हद्दपार असताना नागपुर जिल्ह्यात येण्याची परवानगी घेतली आहे का ? असे विचारले असता त्यांनी परवानगी नसल्याचे सांगितल्याने सदर इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता काहीही मौल्यवान वस्तु अथवा संशयास्पद वस्तु मिळुन आल्या नाहीत. सदर इसम उपविभागीय दंडाधिकारी रामटेक यांचे आदेशाने सहा महिण्याकरिता नागपुर जिल्ह्यातुन हद्दपार केले असताना अवैधरित्या कोणतीही परवानगी न घेता मिळुन आल्याने ताब्यात घेण्यात आले. सदर हदपार इसम शैलेश कडबे रा. बोथीया पालोरा ता. रामटेक जि. नागपुर यांना आदेश क्र. पौ.मा.क्र. १०/२०२३ कलम ५६ (१) (ब) मु.पो.का. अन्ये सहा महिण्याकरीता नागपुर जिल्ह्यातुन हद्दपार केले असताना मिळुन आल्याने त्याचेवर कलम १४२ स.पो.का. अन्वये कारवाई व्हावी करिता कन्हान थानेदार उमेश पाटील हयाना फिर्याद राहुल चव्हाण सपोनि. पोस्टे. कन्हान हयानी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी शहरातील फुटपाथ बेपत्ता

Sun May 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- नागपूरचे उपनगर मानले जाणारे कामठी शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायासह कामठी नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षितांमुळे शहरात फुटपाथवर अतिक्रमण झाले असल्याने कामठी शहरातील प्रमुख चौकासह बाजारपेठ परिसरातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.यातून अपघाताची भितीही वाढली आहे. नुकतेच जयस्तंभ चौक ते गांधी चौक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com