जागतिक कामगार दिनी संविधान चौकात आशा वर्कर यांनी दिली सरकारला चेतावणी

नागपूर :- १ मे जागतिक कामगार दिनानिमित्त आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी आय टी यू) नागपूर जिल्हा तर्फे संविधान चौक येथे कामगार दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आशा वर्कर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे यांनी कामगार स्वतःला कामगार समजून घेत नाही व मानधन वाढ किंवा पगार वाढीच्या आंदोलना मध्ये मोठ्या संख्येमध्ये असतात. परंतु १ मे जागतिक कामगार दिनाचे महत्त्व समजून घ्यायला तयार नाही. मोदी सरकार नवीन कामगार कायदे आणून १२ तासाचे काम लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याकरता सर्व कामगारांनी सरकारला धडा शिकवणे गरजेचे आहे. आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी मागील वर्षी २३ दिवसाचा संप सफल करून सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्ती न केल्यामुळे परत जानेवारी व फेब्रुवारी महिन्यामध्ये ५० दिवसाचा संप सफल केला. त्यामध्ये २२ दिवस मुंबईच्या आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक आंदोलन करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन घडवून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. परंतु दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यामुळे परत आपल्या अधिकाऱ्याकरता आशा वर्कर व गटप्रवर्तक यांना आंदोलनाला पुढे जावे लागू शकतं. ३ मार्चपासून असणारा पोलिओ कार्यक्रम व निवडणुकीच्या घोषणा होण्याची संभावना असल्यामुळे सरकारने दिलेल्या शब्दाचे पालन करत व लहान बालक पोलिओ पासून वंचित राहू नये म्हणून संपाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे. परंतु दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकरता सरकारने ठाम राहावे अन्यथा आम्हाला परत संपावर जावे लागेल अशी शासनाला चेतावणी देण्यात आलेली आहे. कामगार विरोधी चुकीच्या भूमिकेमुळे लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र बदलत चाललेले आहे व मोदी सरकारचे पतन होण्याची स्थिती संपूर्ण देशामध्ये दिसत आहे. हि कामगार एकजुटीची ताकद आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यातून बोलून दाखवले. कार्यक्रमाला प्रामुख्याने कॉ.प्रीती मेश्राम, कॉ.रंजना पौनीकर, कॉ.प्रमोद कावळे, माया कावळे, प्रतिमा डोंगरे, कांचन बोरकर,सोनाली जवादे, मंजुषा फटिंग, भारती वाणी, आरती चांभारे, गीता विश्वकर्मा, सोनम खापर्डे, प्रेमलता मेश्राम, अर्पिता परदेशी, वैशाली मोहोळ, वंदना पंडित, निकिता सहारे, अस्मिता मानवटकर, रूपाली मेश्राम इत्यादी आशा वर्कर उपस्थित होत्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

हा ‘जावईशोध’ कुठून लावला ? शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला

Thu May 2 , 2024
कोल्हापूर :- इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 5 वर्षांत 5 पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला ? असा सवाल विचारत शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना टोला लागवला. इंडिया आघाडीमध्ये अद्याप पंतप्रधानपदाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पुरेसे संख्याबळ आल्यावर यासंदर्भात निर्णय घेऊ असे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी मोदींवर निशाणा साधला. सत्ता मिळवण्यासाठी इंडिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com