संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या संजय नगर,बंगला कॉलोनी येथे एका कुलूपबंद घरी अज्ञात चोरट्याने घरात अवैधरित्या प्रवेश करून लोखंडी आलमारीतील सोन्याचे दागिने व नगदी 9 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 19 हजार रुपयांची घरफोडी केल्याची घटना 26 एप्रिल ला घडली होती. उल्लेखनीय आहे की फिर्यादी हे आपल्या परिवारासह मयत मध्ये गेली असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून घरफोडी केल्याची घटना फिर्यादी नुरी मोहम्मद साहाब शेख उमर वय 38 वर्षे रा संजय नगर कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध भादवी कलम 380,454,457,34 अनव्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला गती दिली असता या चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात जुनी कामठी पोलिसांना नुकतेच यशप्राप्त झाले असून या कारवाहितुन आरोपी शाहरुख खान कादिर खान रा धर्मनगर कन्हान व तरुण मेश्राम रा जे पी नगर कामठी ला अटक करण्यात आले असून त्यांच्याकडुन चोरीस गेलेले 1 लक्ष 19 हजार रुपयाच्या मुद्देमालापैकी 1 लक्ष 10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त व एसीपी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, डी बी पथकाचे इंचार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गडवे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, श्रीकांत भिष्णुरकर,अश्विन चहांदे,दिनेश आगरकर,कुश ठाकूर,रमेश बंजारा,शंकर खंडाते,अंकुश गजभिये यांनी केले.