संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र :- दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा रेल्वे मार्गाच्या कामठी रेल्वे मार्गावरील 1115/30रेल्वे की मी अंतरावरील कामठी रेल्वे स्टेशन ते रमानगर रेल्वे फाटक मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याचा प्रकार आज सायंकाळी सहा दरम्यान घडली.ज्यामुळे कामठी हुन कळमना कडे जाणारी रेल्वेमाल गाडी तूर्तास बंद पडली असून बराच वेळ होईपर्यंत एका रेल्वेरूळावरील वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती.
यावेळी रमानगर रेल्वे फाटक रेल्वे रुळावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे फाटक ओलांडून गणेश ले आउट, रामगड ,आनंद नगर, नवीन कामठी, घोरपड आदी ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या या एकमेव रमानगर रेल्वे फाटक हुन जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने ओव्हरहेड वायर बांधण्याचे काम हाती घेतले व सायंकाळी 6.49 वाजेपर्यंत युद्धपातळीवर हे काम सुरू असून लवकरच दुरुस्तीचे करून रेल्वेरुळावरील सेवा पूर्ववत करण्यात आली.
कामठी रेल्वेस्टेशन हे इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असून दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मुंबई-हावडा मार्गावर वसले असुन या रेल्वे मार्गावरून दैनंदिन शिवनाथ एक्सप्रेस,टाटा इतवारी एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस,इंटरसिटी एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस यासारख्या पॅसेंजर व एक्सप्रेस रेल्वेगाड्या धावतात त्यातून दररोज 5 हजाराच्या आतील प्रवासी रेल्वे प्रवास करतात .मात्र आज ऐन सायंकाळी विद्दुत दाब वाढल्याने कामठी रेल्वे रुळावरील ओव्हरहेड वायर तुटून पडल्याने मालगाडी रेल्वे सेवा ठप्प झाली.ज्यामुळे या मार्गावरून रेल्वेगाडी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प पडली होती . मात्र सदर घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाच्या तांत्रिकीय विभागाने दखल घेत स्टेशन प्रबंधक कार्तिक घोष यांनी ओव्हरहेड वायर जोडनीच्या दुरुस्ती कामाला गती देण्यात आली. व अवघ्या अर्ध्या तासात ओव्हरहेड वायर जोडणी दुरुस्तीकरणाचे काम पूर्णत्वास आणले व रेल्वे वाहतूक सेवा सह रमानगर रेल्वे फाटक सेवा ही पूर्ववत सुरू करण्यात आले.