श्याम लॉज मध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचार..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 9 :- फेसबुक वरून मैत्री संबंध एकतर्फी प्रेमात असल्याची कुणकुण लागताच संबंधित तरुणीने आरोपी तरुणाला दुर्लक्षित केल्याने यावर तोडगा काढण्याचे संमती दर्शवित सदर तरुणीला कामठी च्या श्याम लॉज मध्ये बोलवून घेतले. मात्र चर्चेअंती तरुणाच्या मनात आलेल्या वासनेने सदर तरुणीशी तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.व याची वाच्यता कुणाला केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल दुपारी 2 दरम्यान घडली असून यासंदर्भात पीडित तरुणीने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विजय ठाकरे वय 24 वर्षे रा देवीनगर,वांजरा मांजरा ,नागपूर असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर पीडित तरुणी व आरोपी तरुण हा यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वांजरा मांजरा देवी नगर येथील वास्तव्यास होते.फेब्रुवारी 2020 मध्ये सदर तरुणाने पीडित तरुणीच्या मोबाईलवर फेसबुक रिक्वेस्ट पाठवली त्यावर मैत्रीसंबंधला आलेली गती ही एकतर्फी प्रेमात होत असल्याचे तरुणीच्या लक्षात येताच सदर तरुणीने आरोपी तरुणाकडे दुर्लक्ष केले.यावर एकतर्फी प्रेमात धुंद असलेल्या तरुणाने सदर तरुणीशी मोबाईलवर संपर्क साधून मनमोकळे पनाने बोलून आपले विचार व्यक्त करण्याहेतु बऱ्याच दिवसानंतर आज 8 फेब्रुवारीला कामठीत बोलावले असता यावर सदर तरुणींने आरोपी तरुणावर मैत्रिपूर्ण संबंध असल्याचा विश्वास कायम ठेवून काल 8 फेब्रुवारीला भेटायला गेली .ही भेट कामठी रोड वरच्या बस स्टँड चौक जवळ असलेल्या श्याम लॉज मध्ये झाली या भेटीत बराच वेळ चर्चेअंती आरोपी तरुणाच्या मनात वासनेने शिरकाव केल्याने सदर तरुणीवर तिच्या इच्छेविरुद्ध लैंगिक अत्याचार केला व याबाबत कुणाशी वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.यासंदर्भात पीडित तरुणीने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विजय ठाकरे विरुद्ध भादवी कलम 376,506 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राष्ट्रउभारणीची मुक्त कार्यशाळा - डॉ. रुबिना अन्सारी

Fri Feb 10 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी                  ( समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण शिबिराचे उद्घाटन) कामठी : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम निर्माण करणारी एक संधी तर प्राप्त होतेच सोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव देणारे मुक्त ज्ञानमंच त्यांना लाभते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे राष्ट्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com