राष्ट्रीय सेवा योजना शिबिर राष्ट्रउभारणीची मुक्त कार्यशाळा – डॉ. रुबिना अन्सारी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी                 

( समाजकार्य महाविद्यालय कामठीच्या राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण शिबिराचे उद्घाटन)

कामठी : राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी व राष्ट्रप्रेम निर्माण करणारी एक संधी तर प्राप्त होतेच सोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला वाव देणारे मुक्त ज्ञानमंच त्यांना लाभते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे राष्ट्र उभारणीची अत्यंत प्रभावी अशी मुक्त कार्यशाळा आहे, असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी यांनी केले.

समाजकार्य महाविद्यालय कामठीद्वारा ‘ युवकांचा ध्यास –  ग्राम, शहर  विकास ‘ या संकल्पनेवर आधारित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय भाषण करताना त्या बोलत होत्या. या प्रसंगी प्रमुख अतिथी पारशिवनी पंचायत समितीच्या सभापती मंगला निंबोणे, उपसभापती करुणा भोवते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिरिधर धोटे, उपाध्यक्षा अश्विनी गजभिये,  मुख्याध्यापक खुशाल कापसे, पोलीस पाटील संदीप मेश्राम, माजी सरपंच चुडामन ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.

सात दिवस चालणाऱ्या ह्या शिबिरात ग्राम स्वच्छता अभियान, तज्ज्ञ मार्गदर्शकांचे बौद्धिक व्याख्याने , आरोग्य जनजागृती, समाज प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, गाव सर्वेक्षण, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

उद्घाटनीय समारंभाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  प्रा.डॉ राष्ट्रपाल मेश्राम, सूत्रसंचालन शेखर घाटोळे आणि वैष्णवी बोंदरे, आभार प्रदर्शन लखन लाखे यांनी केले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी शिबिर समन्वयक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम, सहसमन्वयक डॉ.प्रणाली पाटील, प्रा.शशिकांत डांगे, प्रा.गिरीश आत्राम, शिबिरार्थी विद्यार्थी आदींनी परिश्रम घेत आहेत. मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘जागरूक पालक, सुदृढ बालक अभियान’ व महारक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Fri Feb 10 , 2023
नागपूर : जिल्ह्यात डागा स्त्री रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘जागरूक पालक सुदृढ बालक अभियान’ व महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पहिल्याच दिवशी शहरी व ग्रामीण भाग मिळून 93 मोतिबिंदू शस्त्रक्रिया आणि 462 नागरिकांनी रक्तदान केले. तर आरोग्य तपासणी अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.                 जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळा, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights